हुंडा मागितल्याने मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 03:31 IST2017-11-23T03:31:03+5:302017-11-23T03:31:05+5:30

ठाणे : पाच लाख रुपयांचा हुंडा पाठवून दे, अन्यथा बहिणीचा मृतदेह घेऊन जा, अशा आशयाचा मेसेज पाठवून बदलापूरच्या विवाहितेचा छळ करणा-या सहा जणांविरोधात गोरेगाव पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला.

Due to demand for dowry, request to Chief Minister | हुंडा मागितल्याने मुख्यमंत्र्यांना निवेदन

हुंडा मागितल्याने मुख्यमंत्र्यांना निवेदन

ठाणे : पाच लाख रुपयांचा हुंडा पाठवून दे, अन्यथा बहिणीचा मृतदेह घेऊन जा, अशा आशयाचा मेसेज पाठवून बदलापूरच्या विवाहितेचा छळ करणा-या सहा जणांविरोधात गोरेगाव पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. मात्र अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक न केल्याने या विवाहितेने मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली.
बदलापूर येथे राहणाºया मनोदीपा हिचा गोरेगावच्या आरे वसाहतीतील संदीप याच्याशी २००९ मध्ये विवाह झाला. मात्र विवाहानंतर काही दिवसातच हुंडयासाठी तिला शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात झाली. संदीपला घरासाठी दोन लाख दिले तरीही तो मनोदीपा हिच्या आईवडील अािण भावाकडे हुंड्याची मागणी करीत होता. तरीही लग्नानंतर काही दिवसातच संदीपने तिच्या भावाला मोबाईलवर संदेश पाठवून पाच लाख पाठवून दे, अन्यथा बहिणीचा मृतदेह घेऊन जा, असे कळवले. या प्रकरणी मनोदीपाने सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला. तरीही पोलिसांनी अटक न केल्याने तिने थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.

Web Title: Due to demand for dowry, request to Chief Minister