शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

रुग्णाच्या मृत्यूमूळे ठाण्यातील खासगी रुग्णालयावर नातेवाईकांचा रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:47 IST

रुग्णालयात दाखल केल्यानंतर हह्दयविकाराने रुग्णाचा मृत्यु झाल्याने कोपरीच्या आरोग्यम या खासगी रुगणालयाविरुद्ध नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. रुग्णाला त्रास झाल्यानंतर रुग्णालयात स्पेशालिस्ट डॉक्टरच उपलब्ध नव्हते, असा आरोप करीत या रुग्णालयावर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली.

ठळक मुद्दे डॉक्टरांवर कारवाईची मागणीआरोग्यम रुग्णालयावर पोलीस बंदोबस्त कोपरीमध्ये तणावाचे वातावरण

ठाणे : कोपरी येथील आरोग्यम या खासगी रुग्णालयात दाखल झालेले प्रकाश घाडगे (५४) या रुग्णाचा हदयविकाराने मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर कारवाईची मागणी केली. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेने मंगळवारी दिवसभर याठिकाणी तणावाचे वातावरण होते. याठिकाणी आता कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.प्रकाश यांना २४ डिसेंबर रोजी पहाटे १.३० वा. च्या सुमारास छातीत दुखत असल्याच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल केले होते. इसीजी आणि इतर तपासणीत त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे उघड झाले. यासाठी मंगळवारी त्यांची अ‍ॅजोग्राफी होणार होती. मात्र, २४ डिसेंबर रोजी रात्री ७.३० वाजता त्यांना पुन्हा त्रास झाला. अवघ्या काही तासातच त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर रात्री ९.३० वा. च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना त्रास झाल्यानंतर रुग्णालयात कोणीही ह्रदयरोगतज्ज्ञ उपलब्ध नव्हते. रुग्णालयाच्या आरएमओंनीही डॉक्टर येत आहेत, उपचार सुरू आहेत. इतकीच त्रोटक माहिती दिली. याच दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून घाडगे यांच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड गोंधळ घातला. जर रुग्णांना योग्य सुविधा देता येत नसतील तर रुग्णालय सुरू का ठेवता? अशा रुग्णालयावर आणि संबंधित दोषींवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी कोपरी पोलिसांकडे केली.याप्रकरणी या रुग्णालयाने प्रचंड हलगर्जीपण केल्याचाही आरोप या नातेवाईकांनी केला आहे. याचाच जाब विचारण्यासाठी शेकडोंच्या संख्येने मंगळवारी सकाळी मोठ्याप्रमाणात नातेवाईकांनी गर्दी केली होती. कोपरी पोलिसांनी राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलिसांची जादा कुमक याठिकाणी तैनात केली आहे. वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात पाठविला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर ताब्यात घेऊन याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेशही अंबुरे यांनी कोपरी पोलिसांना दिले.कोपरीतील साईनाथ नगरमध्ये राहणाºया घाडगे यांची प्रकृती रविवारी स्थिर असतांना सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास उपचारादरम्यान अचानक त्यांचा मृत्यू झाला. प्रकृती सुधारत असताना अचानक त्यांचा मृत्यू ओढवलाच कसा ? असा संतप्त सवाल करून नातेवाईकानी डॉक्टरांना जाब विचारला. डॉक्टर अहमद यांनी दिलेल्या विसंगत माहितीमुळे नातलग आणि शेकडोच्या जमावाने आरोपांच्या फैरी झाडून रु ग्णालयच बंद करण्याची मागणी केल्याने तणाव वाढला...................त्यानंतर याठिकाणी दाखल झालेले पोलीस उपायुक्त अंबुरे, सहायक आयुक्त प्रकाश निलेवाड आणि कोपरीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविता गायकवाड यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. रु ग्णाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर हृदयविकारतज्ज्ञ डॉक्टरांना का पाचारण केले नाही. रु ग्णालयाचा हा हलगर्जीपणा असल्याचा आरोप रु ग्णाचे भाऊ सतीश घाडगे यांनी केला आहे...................‘‘प्रकाश घाडगे यांना २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेपासून छातीत दुखण्याचा त्रास झाला. ७.३० ते ११ पर्यत कोणीही स्पेशालिस्ट डॉक्टर आरोग्यम मध्ये उपलब्ध नव्हते. हार्टसारख्या आजारावर बीएचएमएस डॉक्टर काय उपचार करणार? सुविधा उपलब्ध नसतील तर ते रुग्णालय बंद करावे, अशी मागणी संतप्त जमावाने केली. या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी करण्यात येत आहे.’’कविता गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरी पोलीस ठाणे................रविवारी प्रकाश घाडगे पहाटे १.१५ वा. रुग्णालयात दाखल झाले त्याचवेळी ते कोलॅप्स झाले होते. एमडी फिजिशियने केलेल्या तपासणीत त्यांना अटॅक आल्याचे समजले. मंगळवारी त्यांची एन्जोग्राफी करण्याचाही सल्ला नातेवाईकांना दिला होता. उपचारानंतर त्यांचा इसीजी नॉर्मल झाला. डॉ. सांगलीकर आणि कार्डिओलॉजीस्ट मयूर जैन यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्यांना पुन्हा ह्रदविकाराचा झटका आला. त्यांना व्हेंटिलेटवरही घेतले. रुग्णालयातील इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस देणा-या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारही केले. परंतु, त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाने यात कुठेही हलगर्जीपणा केलेला नाही.डॉ. शाल्वी गायकवाड, डॉ. अभय गायकवाड, संचालक, आरोग्यम हॉस्पिटल, कोपरी. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू