शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

पिता-पुत्राच्या धाडसामुळे चोरटयांचा चोरीचा डाव फसला, डोंबिवलीतील ज्वेलर्समधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 14:16 IST

दिवसाढवळया घरफोडया आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला असताना सोने चांदिचे दागिने विक्रिचा धंदा करणा-या सुरेश आणि अमित जैन या पिता-पुत्राच्या धाडसामुळे ज्वेलर्सच्या दुकानात घुसून चाकुच्या धाकाने चोरी करण्याचा दोघा चोरटयांचा प्रयत्न फसला.

डोंबिवली-  दिवसाढवळया घरफोडया आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला असताना सोने चांदिचे दागिने विक्रिचा धंदा करणा-या सुरेश आणि अमित जैन या पिता-पुत्राच्या धाडसामुळे ज्वेलर्सच्या दुकानात घुसून चाकुच्या धाकाने चोरी करण्याचा दोघा चोरटयांचा प्रयत्न फसला. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद झाली असली तरी अशाप्रकारे दिवसाढवळया वाढलेल्या चोरीच्या घटनांनी नागरिकांसह व्यापा-यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पश्चिमेकडील सम्राट चौक परिसरात राहणा-या सुरेश जैन यांचे नजीक असलेल्या ठाकुरवाडीकडे जाणा-या रोडलगत अमर सोसायटीमध्ये प्रगती ज्वेलर्स दुकान आहे. सोमवारी ते नेहमीप्रमाणे मुलगा अमितसह दुकानात असताना सायंकाळी चारच्या सुमारास 18 ते 20 वयोगटातील दोन तरूण दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आले. मला तीन ते चार ग्रॅमची सोन्याची चेन दाखवा असे यातील एकाने जैन यांना सांगितले. काही वेळाने सोन्याच्या चेन असलेला पुर्ण बॉक्स दाखवा असेही सांगण्यात आले. बॉक्स दाखविण्याच्या तयारीत असताना एकाने त्याने कमरेत खोचलेला चाकू काढला आणि त्याचा धाक दाखवित दुकानाचे शटर बंद करण्यास सांगितले. यावेळी अमित जैन हे पोलिसांना मोबाईलवरून फोन लावत असताना त्यालाही चाकूच्या धाकाने दमदाटी करण्यात आली. अमितकडे मोबाईलची मागणी करण्यात आली परंतू त्याने मोबाईल न देता खाली ठेवून दिला. दरम्यान दोघेही चोरटे जेव्हा चेन असलेला बॉक्स हिसकावण्याच्या प्रयत्नात असताना त्यावेळी अमितने त्यांना मारायला खुर्ची उचलली असता दोघांनी दुकानाबाहेर धुम ठोकली. जैन पिता-पुत्राने आरडाओरडा केल्यावर नागरिकांनी धाव घेतली यात दोघेही चोरटे त्यांच्यासोबत आणलेली मोटारसायकल तिथेच टाकून ठाकुरवाडीकडे जाणा-या रोडने पळुन गेले. याप्रकरणी जैन यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे. 

घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैददरम्यान ही घटना ज्वेलर्स दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यावरून चोरटयांचे छायाचित्र पोलिसांना मिळाले आहे. विष्णुनगर पोलिसांसह या घटनेचा कल्याण क्राईम ब्रँच देखील समांतर तपास करीत असून त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत माहीती घेतली. घटनास्थळी पोलिसांना चोरटयांनी गुन्हयात वापरलेली मोटारसायकल आढळुन आली आहे. ती ताब्यात घेण्यात आली आहे. त्या गाडीवर मागे-पुढे कुठेही नंबर नाहीये.  

टॅग्स :theftचोरीCrimeगुन्हा