शरीरसुखासाठी चक्क दिराकडूनच विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 04:48 IST2018-08-31T04:47:38+5:302018-08-31T04:48:37+5:30

Due to bodybuilding, Maratha's persecution | शरीरसुखासाठी चक्क दिराकडूनच विवाहितेचा छळ

शरीरसुखासाठी चक्क दिराकडूनच विवाहितेचा छळ

ठाणे : शरीरसुखाच्या मागणीसाठी दिराकडून तसेच पतीसह इतर सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ केल्याची तक्रार एका विवाहितेने नौपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या विवाहितेचे ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव, खोपट भागातील एका व्यावसायिकाशी ९ मार्च २०१७ रोजी लग्न झाले. लग्नानंतर अवघा एक महिना चांगला संसार झाला. पतीचा अंडाभुर्जीचा व्यवसाय असल्याने तो आणि सासू व्यवसायासाठी बाहेर गेल्यानंतर दीर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता.

ही बाब पती आणि सासूला सांगितल्यानंतर त्यांनीही तिलाच दोषी ठरवत तिला मारहाण आणि शिवीगाळ केली. तसेच तिच्यावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. याची तक्रार न करता प्रकरण मिटल्यानंतर तिला माहेरून पैसे आणण्यासाठी पती, सासू आणि नणंद यांनी मारहाण करून तिला घराबाहेर काढले. हा प्रकार मार्च २०१७ ते २६ डिसेंबर २०१७ या कालावधीत घडल्याचे या विवाहितेने नौपाडा पोलीस ठाण्यात २९ आॅगस्ट २०१८ रोजी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांनी सांगितले. या प्रकारामुळे विवाहितेला धक्का बसला आहे.

Web Title: Due to bodybuilding, Maratha's persecution