दुष्काळाचे सावट दूर होईल : कपिल पाटील

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 7, 2023 16:14 IST2023-09-07T16:13:16+5:302023-09-07T16:14:08+5:30

संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात रघुनाथ नगर येथे पाटील यांनी भेट दिली.

drought will be eased said kapil patil | दुष्काळाचे सावट दूर होईल : कपिल पाटील

दुष्काळाचे सावट दूर होईल : कपिल पाटील

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : श्रीकृष्णाच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळाचे सावट दूर होईल असा विश्वास केंद्रिय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात रघुनाथ नगर येथे पाटील यांनी भेट दिली. यावेळी भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. रविंद्र फाटक व इतर उपस्थित होते. श्रीकृष्णाच्या आशिर्वादाने आज पावसाला सुरूवात झाली आहे. आजच्या उत्सावाचा आनंद देशात इतर कुठेही नाही जितका ठाणे जिल्ह्यातील तरुणांमध्ये दिसून येत आहे असे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी सर्वांना दहीकालाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पाटील यांच्या हस्ते काही गोविंदा पथकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गोविंदा पथकांचे त्यांनी कौतुक केले.

Web Title: drought will be eased said kapil patil