घोडबंदर रोडवर टँकर उलटल्याने चालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 21:06 IST2021-02-10T21:01:07+5:302021-02-10T21:06:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : घोडबंदर रोडवर भरघाव वेगात टँकर चालवून तो उलटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडले. यात ...

कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोडबंदर रोडवर भरघाव वेगात टँकर चालवून तो उलटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडले. यात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या कृष्णकुमार सुरेंद्रकुमार सिंग (२८, रा. उत्तर प्रदेश) या टँकरचालकाला कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक करून त्याच्याविरुद्ध मोटारवाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
घोडबंदर रोडवरील उतरणीवर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ८ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हा टँकर भरघाव वेगाने तसेच बेदरकारपणे जात होता. यात टँकरवरील चालक सिंग याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा टँकर रस्त्यावर उलटल्यामुळे या अपघातामध्ये टँकरचे मोठे नुकसान झाले. टँकरमधील डिझेलही रस्त्यावर सांडले. यात हयगयीने टँकर चालवून इतर वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी सिंग याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.