शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रीय मंत्र्यांचेहस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 16:02 IST

जवळपास ४६ लाख रुपये खर्च करून भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची १५ फूट असून १२५० किलो एवढे वजन आणि डार्क ब्राऊन ऑक्सीडाईझ करण्यात आलेल्या या पुतळ्याचे १०० वर्षे एवढे आयुष्यमान आहे,

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न राजकीय पक्ष बाजूला सारुन करावा, अशी सूचना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

नितिन पंडीत

भिवंडी - भिवंडी महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रांगणात. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पंधरा फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले, आरपीआय एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.           भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा महापालिकेत उभारावा अशी भिवंडीकरांची मागणी होती. त्यानुसार पालिकेने पूर्णाकृती पुतळा उभारावा असा ठराव घेऊन त्यासंबंधी शासनाच्या सर्व संबंधित विभागाच्या परवानग्या घेण्यात आल्या असून जवळपास ४६ लाख रुपये खर्च करून भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची १५ फूट असून १२५० किलो एवढे वजन आणि डार्क ब्राऊन ऑक्सीडाईझ करण्यात आलेल्या या पुतळ्याचे १०० वर्षे एवढे आयुष्यमान असल्याची माहिती मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत दिली.               भिवंडीतील अनधिकृत व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा यासाठी भिवंडीत क्लस्टर योजना राबविणे गरजेचे असून तसा प्रस्ताव मनपा आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठवावा अशी सूचना यावेळी पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री शिंदे यांनी मनपा आयुक्तांना केली. समृद्धी महामार्गामुळे भिवंडीतील वाहतूक कोंडी सुटणार असल्याची आशाही शिंदेंनी यावेळी व्यक्त केली. तर डॉ. बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून देशातील सर्व समाजाच्या नागरिकांचा उद्धार केला, तशीच सामाजिक जाणिव केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी लक्षात घेऊन ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न राजकीय पक्ष बाजूला सारुन करावा, अशी सूचना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

त्यास प्रतिउत्तर म्हणून बाबसाहेब हे समानतेचा संदेश देणारे नेते होते, जाती पातीचे राजकारण दूर ठेऊन त्यांनी सर्व कार्यामध्ये समानता ठेवत आपले कार्य केले. ठाण्यातील मंत्र्यांनी ठाणे शहराचा जसा विकास केला तसा भिवंडी शहराचा विकास झालेला नाही. त्यामुळे शहर विकासाबाबत तशीच समानता भिवंडी शहराच्या विकासाबाबत व्हावी कारण भिवंडी आणि ठाणे या शहरांमध्ये विकासाबाबत मोठी तफावत आहे, असे प्रतिउत्तर केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणातून मंत्री आव्हाड यांना दिले.                दरम्यान, कार्यक्रमाच्या शेवटी पुतळ्याचे वास्तू विशारद जीवन धिवरे शिल्पकार स्वप्नील कदम व कंत्राटदार अशा तिघांचा सन्मान यावेळी उपस्थित मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मानसी राजे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनपा उपायुक्त दीपक झिंजाड यांनी व्यक्त केले.  

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील