महिलेवर बलात्कार करणा-या डॉ. प्रतीक तांबेच्या ‘निर्मिती’ क्लिनिकला पोलिसांनी ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 02:45 IST2017-08-22T02:45:19+5:302017-08-22T02:45:23+5:30

सरोगसीच्या तपासणीसाठी आलेल्या महिलेवर बलात्कार करणा-या डॉ. प्रतीक तांबेच्या निर्मिती क्लिनिकला पोलिसांनी सोमवारी सील ठोकले. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तद्विषयक अहवालातून तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे.

Dr rape woman The symbol sealed by the police for the symbol 'copper' creation 'clinic | महिलेवर बलात्कार करणा-या डॉ. प्रतीक तांबेच्या ‘निर्मिती’ क्लिनिकला पोलिसांनी ठोकले सील

महिलेवर बलात्कार करणा-या डॉ. प्रतीक तांबेच्या ‘निर्मिती’ क्लिनिकला पोलिसांनी ठोकले सील

ठाणे : सरोगसीच्या तपासणीसाठी आलेल्या महिलेवर बलात्कार करणा-या डॉ. प्रतीक तांबेच्या निर्मिती क्लिनिकला पोलिसांनी सोमवारी सील ठोकले. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तद्विषयक अहवालातून तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील धारावी येथील २१ वर्षीय पीडित महिलेने तिचे गर्भाशय भाड्याने (सरोगसी) दिले होते. संबंधित व्यक्तीशी करार झाल्यानंतर ही महिला १७ आॅगस्ट रोजी नौपाडा येथील निर्मिती क्लिनिकमध्ये तपासणीसाठी आली होती. त्या वेळी तांबे याने तपासणीच्या नावाखाली बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता. नौपाडा पोलिसांनी डॉक्टरला अटक केली असून तो २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला आहे. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी क्लिनिकला सील ठोकल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी सोमवारी दिली.

Web Title: Dr rape woman The symbol sealed by the police for the symbol 'copper' creation 'clinic