शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध व्हायला जाऊ नका कारण यश मिळवणे सोपे असले तरी ते टिकवणे कठिण - तेजश्री प्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 17:43 IST

कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी गुंफले.

ठळक मुद्देयश मिळवणे सोपे असले तरी ते टिकवणे कठिण - तेजश्री प्रधानकै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफले अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी आमची पिढी छोटे मोठे आनंद खुप मिस करीत असते - तेजश्री प्रधान

ठाणे : शाश्वत हे तुमचे शिक्षण आणि ज्ञान असते. चेहरा हा दहा वर्षांनंतर नसणारे. तुमचे सौंदर्य हे अंतरंगातून येऊ दे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कलेला भाषेचे बंधन नाही. प्रत्येक कला ही त्या भाषेला आणि भाषेच्या प्रत्येक संस्काराला अनुसरून व्यक्त केली जाते. प्रसिद्ध व्हायला जाऊ नका कारण यश मिळवणे सोपे असले तरी ते टिकवणे कठिण असते असा सल्ला अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी तरुणांना दिला.                कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे सातवे पुष्प बुधवारी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी गुंफले. आमची पिढी छोटे मोठे आनंद खुप मिस करीत असते. त्यापैकी मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध. हा सुगंध तुम्हाला महागड्या पुष्पगुच्छामध्ये नाही मिळणार असे सांगताना त्या म्हणाल्या की, त्यांनी आपल्या दिनचर्याबद्दल सांगितले. मी अभिनेत्री नसते तर समिक्षक, समुपदेशक किंवा मोटिव्हेनल स्पीकर असते. मी कधीही अति आत्मविश्वासाने जगले नाही. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात पहिल्यांदा अँकरिंग करताना आलेले अनुभव त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी स्वत:चे विचार मांडणे आणि लेखकाच्या डोक्यातील विचार मांडणे यात खुप फरक आहे. त्यामुळे मला अभिनयापेक्षा निवेदन कठिण असल्याचे त्या म्हणाल्या. आज आम्ही मोठ्या गाड्यांत फिरतो, महागडे कपडे घालतो, महागडे कानातले घालतो हे सर्वांना दिसते. पण जे दिसते तसे नसते. आम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी खुप मोठा संघर्ष केलेला असतो. शुटिंगसाठी मी डोंबिवली ते अंधेरी प्रवास करायची तेव्हा स्वत:सोबत नेहमी एक पुस्तक ठेवायचे. एका लेखकाची साथ मला असायची. आज वाचनामुळेच मी इथपर्यंत पोहोचले आहे. तुमचे बाह्यसौंदर्यापेक्षा आतील सौंदर्य चांगले असणे गरजेचे आहे. यावेळी आपल्या सामाजिक कार्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, आज खुप मुलांना जगात मनापासून शिक्षण घेण्याची इच्छा असते, आपल्या मिळकतीतला खारीचा वाटा त्यांच्या शिक्षणासाठी उचलण्याचे काम मी करीत आहे असेही त्या म्हणाल्या. सुरूवातीला आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर समितीचे सचिव शरद पुरोहीत यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी नंदिनी गोरे यांनी त्यांची मुलाखत घएऊन त्यांना बोलते केले. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक