शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कुणाला त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पाडू नका - जितेंद्र आव्हाड

By अजित मांडके | Updated: February 20, 2025 21:19 IST

"आज त्या दोन मुली, त्याची पत्नी रडत आहे, त्या दोन मुलींचा शाप लागेल अशा शब्दात त्यांनी अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे नाव न घेता टिका केली..."

ठाणे : मी कोणाचा खुन केला नाही, मी कोणाला आत्महत्या करायला भाग पाडले नाही, मात्र पुन्हा परमार आणि जमील शेक होऊ देऊ नका किंबहुना कोणाला त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पाडू नका अशी कळकळीची विनंती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली. आज त्या दोन मुली, त्याची पत्नी रडत आहे, त्या दोन मुलींचा शाप लागेल अशा शब्दात त्यांनी अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे नाव न घेता टिका केली.  ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंब्य्रातील नेते शमीम खान याला सुध्दा त्रास दिला जात आहे. कधी दुबईवरुन, कधी इनकम टॅक्स तर कधी ईडीच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. स्वत:च्या स्वार्थासाठी आणि आव्हाडाला अडकविण्यासाठी छोट्या कार्यकर्त्याला आत्महत्या करायला भाग पाडू नका अशा शब्दात त्यांनी अजित पवार गटाला सुनावले. मला अडकावयचे असेल तर मी तयार आहे, करा माझ्या संपत्तीची खुली चौकशी असे थेट आव्हानही त्यांनी दिले. जमील शेखच्या हत्याचा तपास पुन्हा सुरु करा, त्याचा तपास हिम्मत असेल तर नितीन ठाकरे या पोलीस अधिकाºयाकडे द्या असे आव्हानही त्यांनी केले.आज महापालिकेत कोणतेही पद नसताना कॅबीन वापरली जात आहे, त्यासाठी पालिकेचे कर्मचारी जुंपलेले असता, हे महापालिका आयुक्तांना दिसत नाही का? असा सवाल करीत शहर विकास विभागात जायचे सर्वांच्या कुंडल्या काढायच्या आणि त्यांना घाबरविण्याचे काम करायचे एवढेच काम शिल्लक राहिले आहे. केवळ आपल्याला आमदार व्हायचे आहे, म्हणून धमकावून, घाबरवून स्वत:च्या गटात घेण्याचे घाणेरडे राजकारण केले जात असून हे अजित पवार यांना दिसत नाही का? असा सवालही त्यांनी केला.ठाणे जेलमध्ये हत्याच्या आरोपीला जेवण आणि फोन -ठाणे जेलमध्ये हत्येचा आरोपी असलेल्याला फोन आणि जेवण पुरविले जात आहे. जेलमधील कॅटींग देखील राबोडीतील एक जण चालवत असून त्याच्याकडूनच या सुविधा पुरविल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असतांना त्यांनी देखील याला सहकार्य केले होते. परंतु त्यांच्या कदाचित हे लक्षात आले नसेल की तो आज एक भस्मासुर झाला असल्याची टिकाही त्यांनी केली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस