ठाण्यातून ‘डॉन’ जेरबंद; वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: September 1, 2024 21:53 IST2024-09-01T21:53:22+5:302024-09-01T21:53:33+5:30

दीड वर्षांसाठी केले हाेते हद्दपार; मनाई आदेशाचा केला भंग

don jailed from thane action of wagle estate police | ठाण्यातून ‘डॉन’ जेरबंद; वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

ठाण्यातून ‘डॉन’ जेरबंद; वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मनाई आदेशाचा भंग करून वागळे इस्टेटमधील अंबिकानगर भागात माेकाट फिरणाऱ्या सक्षम ब्रिजेश सिंग ऊर्फ डॉन या २२ वर्षीय गुंडाला अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पाेलिसांनी रविवारी दिली. त्याच्याविरुद्ध १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डाॅन याच्याविरुद्ध हाणामारीचे वागळे इस्टेट पाेलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी त्याला परिमंडळ पाचचे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या तीन जिल्ह्यातून १८ महिन्यांसाठी  हद्दपार करण्याचे आदेश ५ मार्च राेजी दिले हाेते. तरीही ताे वागळे इस्टेट भागात बिनधास्त फिरत हाेता. हीच माहिती मिळाल्यानंतर ३१ ऑगस्ट राेजी सायंकाळी सहाच्या सुमारास वागळे इस्टेट पाेलिसांनी त्याला अटक केली.

Web Title: don jailed from thane action of wagle estate police