डोंबिवलीकरांचा प्रवास वर्षभर खड्ड्यांतूनच?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 02:12 AM2020-01-19T02:12:32+5:302020-01-19T02:12:56+5:30

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सप्टेंबरमध्ये तत्कालीन राज्यमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण व नगरसेवकांनी शहरात ४७२ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या जवळपास ३८ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे भूमिपूजन केले होते.

Dombivlikar journey through the pits all year long? | डोंबिवलीकरांचा प्रवास वर्षभर खड्ड्यांतूनच?

डोंबिवलीकरांचा प्रवास वर्षभर खड्ड्यांतूनच?

Next

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सप्टेंबरमध्ये तत्कालीन राज्यमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण व नगरसेवकांनी शहरात ४७२ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या जवळपास ३८ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे भूमिपूजन केले होते. मात्र, त्यास चार महिने झाले तरी अजूनही एमएमआरडीएकडे या रस्त्यांचा विकास आराखडाच (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) केडीएमसीने सादर केलेला नाही. त्यामुळे या रस्त्यांची कामे प्रत्यक्षात सुरू होऊ शकलेली नाही. परिणामी, येता पावसाळाच काय तर पुढील जानेवारीपर्यंत डोंबिवलीकरांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार असल्याची शक्यता दक्ष नागरिकांच्या समितीने व्यक्त केली.

रस्त्यांवरील खड्डे डोंबिवलीकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या बिकट होते. यंदा पावसाळा नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे व वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले. केडीएमसीनेही खड्डे बुजवण्यासाठी केलेल्या १७ कोटी रुपयांच्या तरतुदीतून वारंवार रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. मात्र, तरीही नागरिकांना फारसा दिलासा मिळाला नाही. डोंबिवलीतील रस्ते सुधारावेत, खड्ड्यांपासून येथील नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी आ. चव्हाण यांनी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ४७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. ३८ रस्त्यांपैकी ३४ रस्ते एमएमआरडीए तर चार रस्ते केडीएमसीतर्फे केले जाणार आहेत. या रस्त्यांचे सप्टेंबरमध्ये मोठा गाजावाजा करत ठिकठिकाणी भूमिपूजन करण्यात आले. निवडणुकीनंतर या रस्त्यांच्या कामाला प्रारंभ होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य डोंबिवलीकरांची होती. मात्र, ती फोल ठरली आहे. आतापर्यंत सर्वच रस्त्यांचा डीपीआर तसेच काही रस्त्यांची प्राथमिक माहिती केडीएमसीकडून मिळालेली नसल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दक्षच्या पदाधिकाºयांना दिली.

डीपीआर बनविण्यासाठी रस्त्यांचे सर्वेक्षण करणाºया कंपनीला काही ठिकाणी स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी मज्जाव करत असल्याची माहिती दक्षला मिळाली आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम अजून किमान तीन ते चार महिने चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर, एमएमआरडीए निविदा मागवून कंत्राटदार निवड प्रक्रिया पार पाडणार आहे. त्यानंतर, प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले. केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या अधिकाºयांची काही दिवसांपूर्वीच संयुक्त बैठक झाली. यावेळी प्रस्तावित काँक्रिटच्या रस्त्यांलगतच्या सर्व्हिस रोडचा मुद्दा चर्चेला आला. त्यावेळी या रस्त्यांच्या खर्चासंदर्भातही अनेक अडचणी येणार असल्याचे महापालिकेतील अधिकाºयांनी सांगितले. या रस्त्यांच्या एकूणच कामासाठी महापालिकेकडे निधी नाही. त्यामुळे एकीकडे एमएमआरडीए रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला तयार असली, तरी सर्व्हिस रोडबाबत अजून महापालिका अनभिज्ञ आहे, असे दक्षच्या पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.
केडीएमसीने एमएमआरडीएला महिनाभरात रस्त्यांचा डीपीआर दिला तरी, कामे सुरू होण्याची शक्यता कमी आहे. फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत कामाला संधी मिळणार आहे. पुढे पावसाळ्यामुळे जून ते सप्टेंबर काम करता येणार नाही. त्यानंतर, केडीएमसीची आॅक्टोबरमध्ये निवडणूक होऊ घातल्याने सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागेल. त्यामुळे त्यानंतरच कामाला सुरुवात होईल. हे सगळे गृहीत धरल्यास पुढील जानेवारीपर्यंत रस्त्यांची कामे दिसू लागतील. परिणामी, डोंबिवलीकरांना येत्या पावसाळ्यातही खड्ड्यांतूनच वाट काढावी लागणार असल्याचा पुनरु च्चार दक्षने प्रसिद्धिपत्रकात केला.

दक्षच्या पदाधिकाºयांची महापालिका व एमएमआरडीएच्या अधिकाºयांशी सविस्तर चर्चा झाली. ज्या रस्त्यांचा डीपीआर पूर्ण झाला आहे, किमान त्या रस्त्यांची निविदा प्रक्रि या त्वरित सुरू करून ते रस्ते लवकरात लवकर होतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी दक्षतर्फे करण्यात आली. हा निर्णय धोरणात्मक असून, संबंधित प्रशासनाच्या अधिकाºयांनी याबाबत सहमती दर्शविली, तर तसा निर्णय घेण्यासाठी संयुक्त बैठक बोलविण्यात येऊ शकते, असे सांगण्यात आले.

डोंबिवलीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी एमएमआरडीएने पाहणी केली आहे. त्यामुळे महापालिकेकडून जे सहकार्य करायचे आहे, ते सगळे झाले आहे. तसेच यापुढेही हवे ते सहकार्य केले जाईल.
- गोविंद बोडके, आयुक्त, केडीएमसी

Web Title: Dombivlikar journey through the pits all year long?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.