कचरा टाकण्याच्या वादातून डोंबिवलीत महिलेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 03:22 IST2017-08-17T03:22:29+5:302017-08-17T03:22:31+5:30

महिलेच्या डोक्यात कचरा फेकण्याच्या किरकोळ कारणावरून लोखंडी सळई घालून तिचा शेजारी रवींद्र मसूरकर याने तिची बुधवारी हत्या केली.

Dombivli woman killed in a controversy | कचरा टाकण्याच्या वादातून डोंबिवलीत महिलेची हत्या

कचरा टाकण्याच्या वादातून डोंबिवलीत महिलेची हत्या

डोंबिवली: पूर्वेकडील आयरे रोड परिसरात राहणाºया सुनंदा प्रकाश लोकरे या महिलेच्या डोक्यात कचरा फेकण्याच्या किरकोळ कारणावरून लोखंडी सळई घालून तिचा शेजारी रवींद्र मसूरकर याने तिची बुधवारी हत्या केली. डोंबिवली पोलिसांनी मसूरकरला तत्काळ अटक केली
आहे.
बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास रवींद्रने सुनंदाच्या घरासमोर कचरा टाकला. घरासमोर कचरा का टाकला, याचा जाब विचारण्यासाठी सुनंदा ही रवींद्रकडे गेली असता त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की, रवींद्रने लोखंडी सळईने सुनंदाच्या डोक्यावर प्रहार केला. सुनंदाच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि त्या जागीच कोसळल्या. शेजाºयांनी त्यांना लागलीच महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्याकरिता नेले. मात्र, तत्पूर्वीच सुनंदा यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर घरातून पळून जाऊन एका चाळीत लपलेल्या रवींद्र याला पोलिसांनी अटक केली व खुनाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Dombivli woman killed in a controversy