डोंबिवली स्कायवॉक आजपासून बंद

By Admin | Updated: November 17, 2016 07:13 IST2016-11-17T07:13:31+5:302016-11-17T07:13:31+5:30

नागरिकांच्या आग्रहाखातर केवळ दिवाळी निमित्त खुला केलेला डोंबिवली पूर्वेकडील स्कायवॉक उर्वरित छताच्या कामासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून पुन्हा बंद होणार आहे.

Dombivli Skywalk closed today | डोंबिवली स्कायवॉक आजपासून बंद

डोंबिवली स्कायवॉक आजपासून बंद

डोंबिवली : नागरिकांच्या आग्रहाखातर केवळ दिवाळी निमित्त खुला केलेला डोंबिवली पूर्वेकडील स्कायवॉक उर्वरित छताच्या कामासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून पुन्हा बंद होणार आहे. २२ डिसेंबरपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार आहे.
अर्धवट छताचे काम करण्यासाठी ठेकेदाराने दिलेल्या कालावधीपेक्षा दोन महिने अधिक काळ घालवला, तरीही ते काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे उरलले काम करण्यासाठी पुन्हा स्कायवॉक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अभियंते प्रशांत भुजबळ यांनी दिली. पालिका ते स्टेशनदरम्यानच्या या स्कायवॉकच्या अर्ध्या भागाचेच काम झाले आहे. उरलेल्या भागाचे काम आता हाती घेतले जाईल. कल्याणच्या दिशेचा पूल आणि स्थानकातील मधमयभागी असलेल्या पुलाला जोडणाऱ्या मार्गिकेचेही काम यावेळी केले जाईल. त्यात लाद्या बदलणे, छत उभारण्यासाठी खांब टाकणे. छताचे काम, दिवे बसवणे अशी कामे केली जातील. स्कायवॉकच्या पश्चिम दिशेकडील मार्गिकेचे काम आधी मार्गी लावण्यात आले आहे. तेथे तिरंगी दिव्यांची योजनाही केली होती.
रेल्वे स्थानकाच्या कल्याण दिशेकडील रेल्वे पुलालगतच हा स्कायवॉक असल्याने त्यावरुन जा-ये करणे नागरिकांना सोपे जाते. (प्रतिनिधी)

Web Title: Dombivli Skywalk closed today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.