हक्काच्या जागेच्या मागणीसाठी डोंबिवलीतील फेरीवाले आले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 14:43 IST2017-12-12T13:12:49+5:302017-12-12T14:43:23+5:30
आमची हक्काची जागा आम्हाला द्या, या मागणीसाठी शहरातील फेरीवाले एकत्र आले असून त्यांनी केडीएमसी आयुक्तांच्या नावे फॉर्म भरले आहेत, त्यात अन्याय दूर करा, हक्क द्या असं नमूद करण्यात आलं आहे.

हक्काच्या जागेच्या मागणीसाठी डोंबिवलीतील फेरीवाले आले एकत्र
डोंबिवली- आमची हक्काची जागा आम्हाला द्या, या मागणीसाठी शहरातील फेरीवाले एकत्र आले असून त्यांनी केडीएमसी आयुक्तांच्या नावे फॉर्म भरले आहेत, त्यात अन्याय दूर करा, हक्क द्या असं नमूद करण्यात आलं आहे. शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील शेकडो फेरीवाले एकत्र आले असून त्यानी महापालिकेच्या उपइमारतीसमोर ठाण मांडले आहे. महापालिकेच्या सिएफसीच्या दालनात अर्ज स्वीकारावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पण ते अर्ज घ्यायचे की नाही याबाबत निर्णय न झाल्याने त्या फेरीवाल्याना महापालिका गेटवरच अडवण्यात आले आहे. त्यामुळे गेटवर शेकडो फेरीवाले जमा झाले असून अर्ज भरण्यासाठी आत घ्या, असे आर्जव करत आहेत. सुरक्षा रक्षकांनी या फेरीवाल्यांना गेटमध्ये धरले असून वरिष्ठांच्या आदेशाची त्याना प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पुढील तीन दिवस अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरच राहणार असल्याची माहिती कष्टकरी हॉकर्स युनियनचे सल्लागार प्रशांत सरखोत यांनी दिली. केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांच्या वेळकाढु धोरणामुळे फेरीवाला प्रश्न चिघळत असल्याची टीका त्यांनी केली.