Dombivali: भर पावसात इंदिरा नगर झोपडपट्टीत पाणी टंचाई, परवडत नसताना टँकरने भरावे लागते पाणी
By अनिकेत घमंडी | Updated: August 2, 2023 18:53 IST2023-08-02T18:52:05+5:302023-08-02T18:53:01+5:30
Dombivali: राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली असून ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा बारवी डॅमदेखील जुलै महिन्यातच भरला आहे.

Dombivali: भर पावसात इंदिरा नगर झोपडपट्टीत पाणी टंचाई, परवडत नसताना टँकरने भरावे लागते पाणी
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली असून ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा बारवी डॅमदेखील जुलै महिन्यातच भरला आहे. मात्र असे असतानाही महानगरपालिकेच्या डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या शेलार चौक येथिल इंदिरानगर त्रिमूर्ती नगर या झोपडपट्टी भागामध्ये गेले अनेक दिवस पाण्याची टंचाई असून तेथील गोरगरीब नागरिकांना परवडत नसतानाही पाण्याची तहान भागवण्यासाठी टँकर मागवावा लागत आहे.
मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने नागरिकांचे तेथील शेकडो रहिवाशांचे प्रचंड हाल होत असल्याची माहिती भाजपचे कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे यांनी दिली. कांबळे व राजू भाई शेख यांनी खूप दिवस प्रयत्न करून इंदिरानगर मधील व त्रिमूर्ती नगर मधील पाणी व्यवस्थित यावे याकरिता महानगरपालिकेच्या अधिकार्यांना सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली, परंतु तरिही त्यात सुधारणा झालेली नाही. अधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत उपाययोजना करून समस्या सोडवली नाही तर शेकडो महिलांच्या उपस्थितीत भर पावसात महापालिका आयुक्तालयावर १५ ऑगस्टच्या निमित्ताने हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा कांबळे यांनी दिला.