शहरं
Join us  
Trending Stories
1
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
2
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
3
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
4
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
5
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
6
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
7
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
8
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
9
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
10
पहिली स्लीपर वंदे भारत धावणार; कती असेल भाडे?
11
जागावाटपाच्या स्वार्थात सर्वच पक्षांना जाहीरनाम्यांचा विसर? 
12
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
13
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
14
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
15
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
16
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
17
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
18
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
19
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
20
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत रस्त्यावरील खडयात खडी पण वाहतूक कोंडी जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 14:41 IST

सोमवारपासून मुसळधार पावसामुळे शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण झालेली असतांनाच बुधवारी संध्याकाळपासून खड्यात खडी-माती टाकण्याचे काम सुरु झाले आहे. पण पावसाच्या संततधारीमुळे माती पाण्यात वाहुन गेल्याने खड्डयातील खडी रस्त्यावर आल्याने वाहतूकीचा वेग मंदावला.गुरुवारी सकाळी १०.३० नंतर दुपारी १.३० वाजेपर्यंत पूर्वेकडील इंदिरा गांधी चौक, चार रस्ता, टिळकपथ, भगतसिंग रोड आदींसह मंजूनाथ शाळेसमोरील रस्त्यावर प्रचंड कोंडी झाली होती.       

ठळक मुद्दे खडी रस्त्यावर पसरल्याने मंदावली वाहतूक स्कूल बसना लेटमार्क

डोंबिवली: सोमवारपासून मुसळधार पावसामुळे शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण झालेली असतांनाच बुधवारी संध्याकाळपासून खड्यात खडी-माती टाकण्याचे काम सुरु झाले आहे. पण पावसाच्या संततधारीमुळे माती पाण्यात वाहुन गेल्याने खड्डयातील खडी रस्त्यावर आल्याने वाहतूकीचा वेग मंदावला.गुरुवारी सकाळी १०.३० नंतर दुपारी १.३० वाजेपर्यंत पूर्वेकडील इंदिरा गांधी चौक, चार रस्ता, टिळकपथ, भगतसिंग रोड आदींसह मंजूनाथ शाळेसमोरील रस्त्यावर प्रचंड कोंडी झाली होती.                                                                                                                                                         रिक्षा, परिवहनच्या बसेस, स्कूल बस आदींसह सर्वांनाच याचा फटका बसला. सकाळच्या सत्रातील सुटलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन येणा-या बस, तसेच दुपारच्या सत्रासाठी शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांना या कोंडीमुळे लेटमार्कला सामोरे जावे लागले.स्कूल बसेस अडकल्याने वाहतूक पोलिसांचीही दाणादाण उडाली होती, परंतू इंदिरा गांधी चौकासह भगतसिंग रोड आणि टिळकपथ आदी ठिकाणची कोंडी बराच वेळ न सुटली नव्हती. त्यात खासगी वाहनांमुळेही अडथळयात वाढ झाली. या सर्व ठिकाणी रस्त्यांच्या खड्यांमध्ये खडी-माती टाकण्यात आली असून त्यातील माती पावसाच्या पाण्यात इतरत्र वाहुन गेली, आणि खड्यांमधील खडी बाहेर आली. त्या खडींमुळे चाकाला काही बाधा होऊ नये यासाठी ती चुकवून वाहन चालवण्याच्या वाहनचालकांच्या प्रयत्नामुळे कोंडीत अधिक भर पडली. त्यामध्ये तीन चाकी टेम्पो, दुचाकीस्वार तसेच मालवाहू नेणा-या वाहनांचा समावेश होता.काही मिनिटांच्या अवधीत सर्व ठिकाणी कोंडी झाल्याने वाहतूक पोलिसांचीही दमछाक झाली होती. त्यातच भगतसिंग रोडवर पीपी चेंबर्स नजीक दुतर्फा चारचाक्या लागल्यानेही पोलिस हैराण झाले होते. गाड्यांमध्ये वाहनचालक बसुन गाड्या पार्क करण्यात आल्याने त्या हटवतांना अथवा त्यांच्यावर कारवाई कशी करायचीहा पेच वाहतूक नियंत्रण करणा-या वॉर्डनपुढे होता. दुपारी १.३० नंतर या सर्व ठिकाणची वाहतूक हळुहळू पूर्वपदावर आली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली