Dombivali: बांधकाम साईटवर मजूर पुरविण्याच्या वादातून खून, आरोपी गजाआड

By प्रशांत माने | Updated: January 9, 2024 18:23 IST2024-01-09T18:18:40+5:302024-01-09T18:23:00+5:30

Dombivali Crime News: बांधकाम साईटवर मजूर पुरविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका बिगारी कामगाराने दुस-या बिगारी कामगाराचा खून केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. आईला शिवीगाळी केली हे देखील हत्येला कारण ठरल्याचे बोलले जातेय.

Dombivali: Murder over dispute over supply of labor to construction site, accused Gajaad | Dombivali: बांधकाम साईटवर मजूर पुरविण्याच्या वादातून खून, आरोपी गजाआड

Dombivali: बांधकाम साईटवर मजूर पुरविण्याच्या वादातून खून, आरोपी गजाआड

- प्रशांत माने

डोंबिवली -  बांधकाम साईटवर मजूर पुरविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका बिगारी कामगाराने दुस-या बिगारी कामगाराचा खून केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. आईला शिवीगाळी केली हे देखील हत्येला कारण ठरल्याचे बोलले जातेय. आरोपीला मंगळवारी पहाटे मानपाडा पोलिसांनी अटक केली. सुमन उमाशंकर यादव (वय २४) रा. रोहतास, बिहार असे अटक आरोपीचे नाव आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील आडवली गावातील पांडुरंग भाने चाळ येथे घडली.

सरोज भिखारी सिंह ( वय ३४) रा. पांडुरंग भाने चाळ असे मृत बिगारी कामगाराचे नाव आहे. आरोपी सुमन याने सरोजवर डोंबिवली पूर्व येथील दावडी गावातील एका बांधकाम साईटवर मजूर पुरविण्याच्या कारणावरून चाकूने हल्ला केला. सरोज ला सुमन ने छातीवर चाकूने तीन ठिकाणी भोसकले. यात सरोजचा मृत्यू झाला. एकाच गावचे रहिवाशी असलेले सुमन आणि सरोज हे एकमेकांचे परिचित होते. तु बांधकाम साईटवर कामगार पुरवितोस मग मला का नाही कामाला लावत यावरून त्यांच्यात वाद झाला यात वाद वाढून शिवीगाळीचा प्रकार घडला. कामाला लावत नाहीस हे कारण जरी प्रमुख असलेतरी आईवरून शिवी दिली त्याचा राग सुमन ला आला आणि त्याने सरोज चा खून केला अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Dombivali: Murder over dispute over supply of labor to construction site, accused Gajaad