Dombivali: आरपीएफ महिला पोलिसाला मारहाण करणाऱ्यास अटक
By अनिकेत घमंडी | Updated: October 27, 2023 23:05 IST2023-10-27T23:05:08+5:302023-10-27T23:05:46+5:30
Dombivali: आरपीएफ महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या मारुती आत्राम, रा. सातारा सध्या मुंबईत फिरस्ता यास शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.

Dombivali: आरपीएफ महिला पोलिसाला मारहाण करणाऱ्यास अटक
- अनिकेत घमंडी
डोंबिवली: आरपीएफ महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या मारुती आत्राम, रा. सातारा सध्या मुंबईत फिरस्ता यास शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली. गुरुवारी मुंबई येथून कसारा येथे जणार्या एका लोकलमध्ये वसिंद दरम्यान महिला आरपीएफ कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्यानुसार कल्याण।लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यानुसार कार्यवाही करण्यात आली.
दुसाने यांनी सांगितले की, सीसीकॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शी यांच्या मदतीने त्यास अटक करण्यात आली. कल्याण, दिवा, ठाणे मार्गावर अनेकदा गर्दुल्ले यांनी प्रवाशांवर नशेत हल्ले केलयाच्या घटना घडल्या आहेत.