उल्हासनगर महापालिका एबीसी सेंटरमध्ये श्वानाचा मृत्यू
By सदानंद नाईक | Updated: September 26, 2025 17:39 IST2025-09-26T17:39:58+5:302025-09-26T17:39:58+5:30
याप्रकरणी निर्बीजीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर महापालिका एबीसी सेंटरमध्ये श्वानाचा मृत्यू
सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका श्वान निर्बीजीकरण केंद्रात नसबंदीसाठी आणलेल्या सोनी नावाच्या कुत्रीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी निर्बीजीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर महापालिकेने शहरातील कुत्र्याच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी श्वान निर्बीजिकरण केंद्र सुरू केले. दोन वर्षांपूर्वी १५ हजार पेक्षा जास्त श्वानाची नसबंदी केल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात कुत्र्याची संख्या कमी होण्या ऐवजी वाढल्याची ओरड झाल्यावर, महापालिकेने पुन्हा श्वान निर्बीजीकरणाचा ठेका एका खाजगी संस्थेला दिला. महापालिका मुख्यालया इमारतीच्या मागच्या बाजूला श्वान निर्बीजीकरण केंद्र असून १५ ते २४ सप्टेंबर च्या दरम्यान सोनी नावाच्या कुत्रीवर नसबंदीचे उपचार सुरू होते. मात्र नसबंदी दरम्यान तीचा मृत्यू झाला. कुत्रीला मारून टाकण्यात आले असावे, अथवा विष देऊन मारले असावे. असा संशय निर्माण झाला.
सोनी नावाच्या कुत्रीच्या मरणास एबीसी केंद्रातील कर्मचारी दोषी असल्याचा ठपका ठेवून पुष्पा मेघराज पिल्ले या नर्सच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निर्बीजीकरण केंद्राची चौकशी केली असता, किती कुत्रे उपचार दरम्यान मेली. याच्या चौकशीची मागणी सर्वस्तरातून होत आहे.