शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वांद्रे-कुर्ला संकुल कोविड केंद्रात डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी,  रुग्णांनी  साजरी केली दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 1:33 AM

फराळ, मिठाईचे केले वाटप, रुग्णालय व पालिका प्रशासनाचा उत्सव साजरा करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घरापासून दूर राहणाऱ्या कोविड रुग्णांचाही विचार करून यंदा कोविड रुग्णालय वा केंद्रांमध्ये रुग्णालय प्रशासन, पालिका प्रशासनाने दिवाळी साजरी कऱण्यावर भर दिला. मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड केंद्रात दिवाळीनिमित्त फराळ, मिठाईचे वाटप करण्यात आले. शिवाय, डॉक्टर व येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी मिळून रुग्णांसह दिवाळी साजरी केली.

कोरोनाच्या उपचारादरम्यान रुग्णांना शारीरिक व मानसिक आव्हानास तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत, त्यांचा एकटेपणा, ताणतणाव आणि चिंता यावर मात करण्यासाठी पालिकेने मोबाइल फोनची व्यवस्था केली आहे. जेणेकरून तो आपल्या घरच्यांशी बोलत आहेत. त्याचप्रमाणे, तणावमुक्त होण्यासाठी समुपदेशनाचीही व्यवस्था केली आहे.

दिवाळीनिमित्त पालिकेच्या वांद्रे कुर्ला कोविड काळजी केंद्रात रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मिठाई, चकली आणि इतर खाद्यपदार्थांचे वाटप पालिकेने केले. याविषयी, अधिक माहिती देताना केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले, केंद्रातील ४०० रुग्णांना खाद्यपदार्थांचे वाटप केले.  

खाद्यपदार्थांचे वाटपउपचारांमध्ये गुंतलेल्या डॉक्टर, नर्स व इतर कामगारांना खाद्यपदार्थ दिले. 

रुग्णांची घेतली काळजीकोरोनाच्या उपचारादरम्यान रुग्णांना शारीरिक व मानसिक आव्हानास तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत, त्यांचा एकटेपणा, ताणतणाव आणि चिंता यावर मात करण्यासाठी पालिकेने मोबाइल फोनची व्यवस्था केली आहे. जेणेकरून तो आपल्या घरच्यांशी बोलत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिवाळीनिमित्त रुग्णांना भोजन वाटप करण्यात आले.  कोविड केअर केंद्र ही कर्मचार्‍यांनी सजवले होते. काही केंद्रांमध्ये संगीतही वाजवले गेले.- सुरेश काकाणी,     पालिकेचे अतिरिक्त आयुक्त     (आरोग्य)