हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST2021-07-27T04:41:45+5:302021-07-27T04:41:45+5:30
....... मुलींचे माता-पिताही जबाबदार मुलीला चांगले शिक्षण दिले जाते. अगदी नोकरीही लागते. पण, लग्नाची वेळ आली की, तिला सोन्याचे ...

हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव?
.......
मुलींचे माता-पिताही जबाबदार
मुलीला चांगले शिक्षण दिले जाते. अगदी नोकरीही लागते. पण, लग्नाची वेळ आली की, तिला सोन्याचे दागिने द्यायचे. मुलाला घराला मदत करायची. काही पैसे द्यायचे, अशा चर्चा सुरू होतात. तशी ती हुंड्याच्या रूपातून रोख किंवा दागिने दिले जातात. हे परंपरेच्या नावावर होते. पण, हीच परंपरा अगदी जीवघेणी ठरते. याला काही अंशी मुलींचे माता-पिताही जबाबदार आहेत. पण, आता या अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आई-वडिलांप्रमाणेच मुलांनीही पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
कल्पना हजारे, सामाजिक कार्यकर्त्या, ठाणे
.........
नवी पिढी बदलतेय...
मुळात, लग्न करताना दोन मने आणि कुटुंब जुळली जातात. मुला-मुलींचे शिक्षण पाहिले जाते, जावे. आता तर मुलीही प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने शिक्षण घेऊन नोकरी करीत आहेत. किंबहुना, मुलांपेक्षा त्या गुणवत्तेमध्ये आणि नोकरीतही वरच्या श्रेणीत आहेत. मग हुंडा घेण्याचा अट्टाहास कशासाठी केला जातो. ते न समजणारे आहे.
प्रथमेश आतकर, ठाणे
...........
काही चालीरीती या परंपरेने पुढे येत राहतात. पण, त्यातील कोणत्या चालू ठेवायच्या किंवा कोणत्या नाही. त्या सर्वस्वी नवीन पिढीवरही अवलंबून आहे. त्यामुळेच हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेला सर्वांनीच कडाडून विरोध करणे अपेक्षित आहे.
करण माळवे, श्रीनगर, ठाणे