शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

ज्ञानेश्वर महाराज हे पहिले बंडखोर, अशोक शहाणे यांचे आख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 05:26 IST

‘कुंडली बघून मुलीचे लग्न जुळवण्याइतके भाषांतर करणे सोपे नाही. तसे करणाऱ्यांनी या फंदात पडू नये’, असा थेट हल्ला चढवत ‘माझ्या मºहाठीचिये बोल कवतिके। परि अमृतातेहि पैजा जिंके’ असे लिहून ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची भाषा समजल्या जाणाºया संस्कृतविषयी बंड केले, ते कुणी का सांगत नाही, असा थेट सवाल ज्येष्ठ भाषा अभ्यासक, सुप्रसिद्ध साहित्यिक, कला अभ्यासक अशोक शहाणे यांनी त्यांच्या ‘आख्याना’त केला.

ठाणे : ‘कुंडली बघून मुलीचे लग्न जुळवण्याइतके भाषांतर करणे सोपे नाही. तसे करणाऱ्यांनी या फंदात पडू नये’, असा थेट हल्ला चढवत ‘माझ्या मºहाठीचिये बोल कवतिके। परि अमृतातेहि पैजा जिंके’ असे लिहून ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची भाषा समजल्या जाणाºया संस्कृतविषयी बंड केले, ते कुणी का सांगत नाही, असा थेट सवाल ज्येष्ठ भाषा अभ्यासक, सुप्रसिद्ध साहित्यिक, कला अभ्यासक अशोक शहाणे यांनी त्यांच्या ‘आख्याना’त केला.ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात रविवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि साद या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहाणे यांना ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी बोलते केले. साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या मुक्तसंवादाचे साक्षीदार झाले.‘लिहित का नाहीत?’ या प्रश्नापासून सुरू झालेल्या या संवादात शहाणे यांच्या वाङ्मयीन चळवळीचे, त्यांनी केलेल्या बंडखोरीचे, भाषावैभवाचे, भाषासंस्कृतीच्या चिकित्सेचे अवाक् करणारे संचित त्यांनी रिते केले. ‘साताºयात असताना शाळा संपली की संघाच्या शाखेत जायचो. तिथे गटवार उभं केलं जायचं. प्रार्थना व्हायची. त्याआधी वर्तमानपत्रातले उतारे वाचून दाखवले जायचे. ते नथुराम गोडसेच्या विचाराचे असायचे. एकदा मी काहीतरी प्रश्न विचारला, त्यामुळे खाडकन थोबाडीत ठेवून दिली. मोकळा वेळ भरून काढायला जाणाºया मला जर थोबाडीत खावी लागत असेल तर कशाला जायचे, म्हणून संघात जाणे बंद केले, ती पठडीबाहेर पडण्याची सुरुवात होती.’ असे सांगत शहाणे यांनी अनेक बंडांचे अनुभवकथन केले.‘पुढील शिक्षणासाठी पुण्यात आलो. तिथे कॉलेजपेक्षा ‘गूडलक’ कॅफेवर रंगणाºया मैफलीतच अधिक शिक्षण मिळाले,’ असे सांगत मासिक संपादन करण्याची मिळालेली संधी, ‘रसरंजन’ अंकाच्या संपादनाचे अनुभव, भल्याभल्यांनी अंकाचे केलेले कौतुक, जीएंनी पाठवलेले पत्र, भाऊ पाध्येंच्या ‘वासू नाका’ची, चि. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबरीची, अनेकांशी उडालेल्या खटक्यांची गोष्ट सांगत जुन्या आठवणींचा एक समृद्ध कॅनव्हास अशोक शहाणे यांनी चित्रबद्ध केला.बंगाली भाषेतील अनेक कलाकृतींचे मराठीत भाषांतर करणारे शहाणे यांनी त्याविषयीच्या अनेक आठवणी सांगितल्या. ‘कुंडली पाहून मुलीचे लग्न जुळवण्याइतके भाषांतर करणे म्हणजे सोपे नाही. अनुवाद करताना काही पथ्ये पाळायची असतात. ज्या भाषेत ती गोष्ट असते, तिथले ते कल्चर असते. अनुवाद करताना त्या परंपरेच्या जवळ जाणारी आपली संस्कृती शोधावी लागते. तेव्हा ती आपल्याला जवळची वाटते. त्यासाठी तिथली संस्कृती, त्यासाठी वापरलेले शब्द समजून घेण्याची गरज असते,’ असे शहाणे म्हणाले. बंगालीत टागोर तर मराठीत कोण? या प्रश्नावर शहाणे म्हणाले, तुकाराम आहेत, पण वाचतो कोण? त्यांची कविता ३०० वर्षांपूर्वीची आहे, तरी ती जेव्हा वाचतो तेव्हा जिवंत होते.संस्कृतविषयी बोलताना शहाणे म्हणाले, संस्कृत जर देवाची भाषा म्हणावी इतकी समृद्ध असेल, तर मराठी निपजली नसती. ‘प्राकृत’ ही संस्कृत भाषेतील शिवी आहे, असे सांगत त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ‘अमृतातेहि पैजा जिंके’चा संदर्भ देऊन, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले ते बंड आहे, असे विवेचन केले.पुढील संवाद ढाले यांच्याशी‘साद’ ही संस्था पुढचा संवाद प्रसिद्ध साहित्यिक राजा ढाले यांच्याशी साधणार असून, संवादक प्रसिद्ध कवयित्री डॉ. प्रज्ञा पवार असणार आहेत.‘ण’ व ‘न’ म्हणणाºयांवर ताशेरे‘बाणा’तल्या ‘ण’ला ‘न’ म्हणणाºयांना नाव ठेवणारे ‘प्रश्ना’तल्या ‘न’चा ‘ण’ उच्चार करतात. त्यांचे काय करायचे, असा उलट प्रश्न विचारून, त्यांनी या संवादाची सांगता केली आणि सभागृह ‘प्रश्न’तला ‘न’ उच्चारण्याचा सराव करू लागले.शिवाजी महाराज आणि तुकाराम समकालीनआजची परिस्थिती लेखक, कलावंतांसाठी चांगली नाही. आणीबाणीची परिस्थिती आहे, आपणास काय वाटते? या प्रश्नावर व्यक्त होताना शहाणे म्हणाले, ‘आपल्याकडे ही परिस्थिती नेहमीच असते. शिवाजी महाराज आणि तुकाराम समकालीन होते’ असे सांगत त्यावेळीही तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवण्यात आल्याची आठवण उपस्थितांना झाली.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या