शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

दिव्यांग निधीसाठी दिव्यांगांनी दिला जेलभरो आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 21:23 IST

मागील वर्षापासून दिव्यांगांकडून दिव्यांग निधीची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापही ही मागणी पूर्ण केली जात नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसात दिव्यांग निधी न दिल्यास मुलाबाळांसह जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी संघटना संचालित बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेने दिला आहे.

ठळक मुद्देमागणी करुनही वर्षभरापासून दिव्यांग निधीचा अभाव:मुलाबाळांसह होणार आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मागील वर्षापासून दिव्यांगांकडून दिव्यांग निधीची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापही ही मागणी पूर्ण केली जात नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसात दिव्यांग निधी न दिल्यास मुलाबाळांसह जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी संघटना संचालित बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेने ठाणे महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिला आहे.दिव्यांग विकास कामगार संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद युसूफ खान यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, गेल्या वर्षी २३ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यापासून आजतागायत म्हणजेच दुसऱ्याही लॉकडाऊनपर्यंत दिव्यांगांना हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. अनेक दिव्यांग हे छोटा मोठा व्यवसाय करु न आपल्यासह कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत. जे दिव्यांग स्टॉल चालवित आहेत; त्या दिव्यांगांच्या स्टॉलवर स्टेशनरी, झेरॉक्स यासारख्या वस्तूंची विक्र ी होत आहे. या सुविधा जीवनावश्यक श्रेणीमध्ये येत नसल्याने दिव्यांगांचे हे स्टॉल बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. परिणामी, दिव्यांगांच्या घरात एकवेळचे अन्न शिजणेही अत्यंत अवघड झाले आहे. सन २०२० मध्ये मध्ये दिव्यांगांना अर्थसाह्य करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अर्ज भरु न घेतले होते. त्यावेळी सुमारे दहा हजार लोकांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, तेंव्हापासून आजतागायत कोणत्याही प्रकारचे अर्थसाह्य देण्यात आलेले नाही.केंद्र सरकारसह न्यायालयाने दिव्यांगांची उपासमार होऊ नये, यासाठी त्यांना अर्थसाह्य करावे, अशा सूचना केल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी ठामपाकडून झालेली नाही. अर्थसंकल्पातही दिव्यांग निधीची तरतूद असतानाही त्याचे वितरण करण्यात येत नाही. त्यामुळे दिव्यांगांना उपाशी मरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. याचा विचार करु न त्यांना तत्काळ निधीचे वाटप करावे. अन्यथा, सर्व दिव्यांग आपल्या मुलाबाळांसह महामारी अधिनयम १८९७ चा भंग करु न जेलभरो आंदोलन करु न कारागृहात जाण्याचा मार्ग पत्करतील, असा इशाराही खान यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका