चारित्र्यावर संशयातूनच प्रियकराने केली निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 18:42 IST2018-12-10T18:22:02+5:302018-12-10T18:42:58+5:30
मानपाडा येथे राहणारी जयश्रीचे लग्न झाले होते.
_201707279.jpg)
चारित्र्यावर संशयातूनच प्रियकराने केली निर्घृण हत्या
डोंबिवली : मानपाडा येथील किणी चाळीतील एका रूममध्ये जयश्री मोजाड (२३) या महिलेचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला होता. चारित्र्याच्या संशयावरूनच डोक्यात सिलिंडर घालून जयश्रीची हत्या करून पळून गेलेल्या जितेंद्र सपकाळे याला मानपाडा पोलिसांनी अटक केली.
मानपाडा येथे राहणारी जयश्रीचे लग्न झाले होते. मात्र नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर मागच्या दीड वर्षांपासून ती जितेंद्रसोबत गोळवली येथे राहत होती. जितेंद्र हा जयश्रीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्याच्यामध्ये वाद होत होते. आठवडयाभरापूर्वीदेखील जितेंद्रने जयश्रीला मारहाण केली होती. दरम्यान, रविवारी जयश्री राहत असलेल्या रूममधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांना रुममध्ये जयश्री मृतावस्थेत आढळून आली.
जयश्रीच्या आईने जितेंद्रवर संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली होती. जयश्रीची हत्या करणाऱ्या जितेंद्रला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश राऊत यांनी लोकमतला दिली.