शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका बांधकाम विभागावर अविश्वास? उल्हासनगरातील नाले, गटारीची कामे राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:18 IST

महापालिका हद्दीतील मात्र शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा विकास निधीतील विकास कामे राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला.

उल्हासनगर : महापालिका हद्दीतील मात्र शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा विकास निधीतील विकास कामे राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला. आमदार कुमार आयलानी यांनी तशी शिफारस केल्याने, त्या कामाला महापालिका बांधकाम विभागाने एनओसी दिल्याची माहिती उपायुक्त विशाखा मोटघरे यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिका हद्दीतील नाली, पायवाटा, ड्रेनेज, आदी शासन निधीतील प्रत्येकी १० लाखाची शेकडो कामे महापालिका बांधकाम विभागा ऐवजी राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. यापूर्वी ही कामे महापालिका बांधकाम विभागाकडून झाल्याचा इतिहास आहे. मात्र २७ एप्रिल २०२३ च्या नगर विकास विभागाच्या परिपत्रकानुसार शासन निधीतील विकास कामे महापालिका बांधकाम विभागा ऐवजी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्याची तरतूद केली. त्यानुसार अवघ्या १० दिवसानंतर ७ जुलै २०२३ रोजी महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोई सुविधा निधीतील १० कोटीची प्रत्येकी १० लाखाची एकूण १०० विविध विकास कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याचा आदेश नगर विकास विभागाने काढला. त्या सर्व कामाला महापालिका बांधकाम विभागाने एनओसी दिली. अशी माहिती उपायुक्त विशाखा मोटघरे यांनी दिली. 

महापालिका हद्दीतील झालेल्या प्रत्येक विकास कामाची नोंद महापालिका बांधकाम विभागाकडे असून त्याची जबाबदारीही विभागाकडे असते. विकास कामे निकृष्ट झालेतर, संबंधित ठेकेदाराला नोटीस देऊन ती कामे पुन्हा करून घेतली जाते. तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाते. प्रत्येकी १० लाखाची शेकडो कामे महापालिका बांधकाम विभागा ऐवजी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाल्यावर, त्या बांधकामाची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न विचारला जात आहे. राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामाच्या प्रमाणात अभियंत्याची संख्या आहे का? कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार होत आहे? महापालिका बांधकाम विभाग असी बांधकामे करण्यास लायक नाही का? आदी अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाली.

 राजकीय नेत्यांना थांगपत्ताच नाही. शासन निधीतील विकास कामे महापालिका बांधकाम विभागा ऐवजी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात आहेत. याची माहिती बहुतांश राजकीय पक्षाचे नेते व माजी नगरसेवकांना माहित नसल्याचे उघड झाले. विकासासाठी विशेष निधी शासन देते. त्या कामावर महापालिकेचे नियंत्रण असून ते कामे केंव्हा झाली. याची नोंद विभागाकडे असते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरUlhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022