दुष्काळग्रस्तांसाठी जिल्हा बँकेचे २१ लाख

By Admin | Updated: December 12, 2015 00:57 IST2015-12-12T00:57:00+5:302015-12-12T00:57:00+5:30

राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २१ लाखांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्याकडे वर्षा निवासस्थानी सुपूर्द केला आहे

District Bank's 21 million for drought affected | दुष्काळग्रस्तांसाठी जिल्हा बँकेचे २१ लाख

दुष्काळग्रस्तांसाठी जिल्हा बँकेचे २१ लाख

ठाणे : राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २१ लाखांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्याकडे वर्षा निवासस्थानी सुपूर्द केला आहे. धर्मादाय निधीतून ही मदत केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी दिली.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाच्या परिस्थितीमुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडूनही निधीच्या माध्यमातून हातभार लागावा यासाठी संचालक मंडळाच्या २७ नोव्हेंबरच्या बैठकीत अध्यक्षांनी तसा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाला. त्यानुसार २१ लाखांच्या निधीचा धनादेश बँकेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी भिवंडीचे खासदार तथा बँकेचे माजी अध्यक्ष कपिल पाटील, अध्यक्ष बाबाजी पाटील, संचालक भाऊ कुऱ्हाडे, सुभाष पवार, इंद्रजित पडवळ आणि प्रशांत पाटील उपस्थित होते.

Web Title: District Bank's 21 million for drought affected