वृत्तपत्र टाकणाऱ्या मुलांना कपडे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:54 AM2019-12-13T01:54:52+5:302019-12-13T01:55:22+5:30

सेवा सहयोग संस्था गरजू गरीब विद्यार्थ्यांना व शाळांना कपड्यांपासून तर शालेय साहित्य वाटून मदतीचा हातभार लावत असते.

Distribute clothing to children throwing newspapers | वृत्तपत्र टाकणाऱ्या मुलांना कपडे वाटप

वृत्तपत्र टाकणाऱ्या मुलांना कपडे वाटप

googlenewsNext

ठाणे : ठाणे शहरात गुरुवारी सेवा सहयोग फाउंडेशन, ठाणे व बिग बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन यांच्या सहकार्याने ठाणे शहरात घरोघरी वर्तमानपत्र टाकणाऱ्या एकूण ४५ गरीब व होतकरू मुलांना मोफत कपडे वाटप करण्यात आले.

अनेक गरीब मुलांना आपल्या परिस्थितीमुळे शिक्षणाबरोबर हे काम करावे लागते त्यांना मदतीचा हात म्हणून सेवा सहयोग संस्था गरजू गरीब विद्यार्थ्यांना व शाळांना कपड्यांपासून तर शालेय साहित्य वाटून मदतीचा हातभार लावत असते. प्रसंगी सेवा सहयोग संस्थेचे किशोर मोघे, अमृता संभुस, संकेत कुलकर्णी व गणेश धनावडे व ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे दत्ता घाडगे, वैभव म्हात्रे व गणेश शेडगे उपस्थित होते. तर वर्तमानपत्रांच्या कंपनी प्रतिनिधी म्हणून रोहित पिल्ले, अरुण देशमुख व संतोष पडवळ उपस्थित होते.

Web Title: Distribute clothing to children throwing newspapers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.