प्रभागातच लागणार कचऱ्याची विल्हेवाट

By Admin | Updated: March 24, 2017 01:03 IST2017-03-24T01:03:24+5:302017-03-24T01:03:24+5:30

पश्चिमेतील कोकण विभाग वसाहतीच्या शिवसेना नगरसेविका नीलिमा पाटील यांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे या

Disposal disposal will be required by the department | प्रभागातच लागणार कचऱ्याची विल्हेवाट

प्रभागातच लागणार कचऱ्याची विल्हेवाट

कल्याण : पश्चिमेतील कोकण विभाग वसाहतीच्या शिवसेना नगरसेविका नीलिमा पाटील यांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे या प्रभागातील ओल्या कचऱ्यावर आता प्रभागातच प्रक्रिया होणार आहे.
गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक संजय पाटील, मनसृष्टी संस्थेच्या संचालिका वैशाली तांबट आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभागात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करू शकतो, ही संकल्पना मनसृष्टी संस्थेच्या तांबट यांनी मांडली. त्यांच्या सूचनेनुसार नगरसेविका पाटील यांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे. महापालिकेच्या प्रकल्पाची वाट न पाहता एक लहान प्रयत्न पाटील यांनी सुरू केल्याने त्यांच्या या सकारात्मक कृतीचे देवळेकर यांनी कौतुक केले. तसेच हा प्रकल्प नियमित सुरू राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रभागातील कचरा प्रभागात खतप्रक्रियेसाठी वापरला जाईल. त्यामुळे प्रभागात दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल. तसेच कचरा वाहून नेण्यासाठी फक्त सुक्या कचऱ्याच्या वाहतुकीवर खर्च करावा लागेल. जैव कचरा गांडूळ खतासाठी वापरला जाईल.
कल्याण-डोंबिवली महापालिका केवळ दोन टन कचऱ्यावर प्रक्रिया करते. शहरातून गोळा होणाऱ्या ५७० मेट्रीक टन कचऱ्यापैकी केवळ सहा टन कचऱ्यावर महापालिका प्रक्रिया करते. महापालिकेने १२ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प प्रस्तावित केले आहे. त्यापैकी उंबर्डे येथेच १० टन क्षमतेचा प्रकल्प सुरू झाला आहे. प्रत्येक प्रभागातील नगरसेवकाने पाटील यांच्या धर्तीवर प्रभागात लहान गांडूळ खत प्रकल्प सुरू केल्यास कचरा वाहतुकीचा खर्च कमी होऊन जागच्या जागेवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे कचराकुंडीत कचरा साठणार नाही. तसेच दुर्गंधीचा सामनाही करावा लागणार नाही. ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकावा, अशी तंबी महापालिकेने दिली होती. मात्र, ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे काम महापालिकेने सुरूच केलेले नाही. केवळ कारवाईचे इशारे देऊन कचरा वर्गीकृत पद्धतीने गोळा होणार नाही. त्यासाठी नागरिकांना शिस्त लावली गेली पाहिजे. प्रत्येक प्रभागात कचऱ्यापासून २४ तासांत खतनिर्मिती यंत्र पुरवण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या पटलावर आला होता. त्या यंत्र खरेदीचे घोडे कुठे अडले, हे अद्याप कोणालाही माहिती नाही. तसेच महापालिका ५०० कर्मचाऱ्यांना कचरा खाणाऱ्या जादूच्या बादल्या पुरवल्या जाणार होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Disposal disposal will be required by the department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.