सिव्हील रूग्णालयात मिळणार आता अपंगत्वाचे प्रमाणपत्र
By Admin | Updated: March 3, 2016 02:15 IST2016-03-03T02:15:22+5:302016-03-03T02:15:22+5:30
येथील सिव्हील रु ग्णालयामध्ये आता आॅडियोलॉजीस्ट असल्यामुळे त्यांच्याव्दारे अपंग व्यक्तींची तपासणी करून तत्काळ अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आमदार निरंजन डावखरे

सिव्हील रूग्णालयात मिळणार आता अपंगत्वाचे प्रमाणपत्र
ठाणे : येथील सिव्हील रु ग्णालयामध्ये आता आॅडियोलॉजीस्ट असल्यामुळे त्यांच्याव्दारे अपंग व्यक्तींची तपासणी करून तत्काळ अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकारी अश्विनी जोशी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयाच्या अनुषंगाने कर्णबधीरत्वाचे प्रमाणपत्र मिळण्याकरिता आता कर्णबधीर अपंगांना श्रवण चाचणी करण्यासाठी बांद्रा येथील भारतीय श्रवण विकलांग संस्थेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही.
याशिवाय ० ते ५ वर्ष वयाच्या अपंग मुलांची तपासणी देखील येथेच होणार आहे. त्यामुळे आरटीई या कायद्याअंतर्गत अपंग विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी प्रमाणपत्र उपयुक्त ठरणार आहे. तसेच मतिमंद व्यक्तीचा आयक्यू तपासणीबाबत सायकॉलॉजिस्ट तज्ञ व्हीजीटर स्वरु पात उपलब्ध करण्याची सूचना जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना केली.
आठवड्यातून दोन दिवस तपासणी करण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन डावखरे यांनी दिले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक , शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, , समाजकल्याणचे सहाय्यक उपआयुक्त यावेळी उपस्थित होते.