शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

मालमत्ता कागदपत्रांचे डिजिटलायझेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:28 AM

नोंद प्रक्रिया सुरू : तब्बल ५७ लाख दस्तऐवज

सुरेश लोखंडे 

ठाणे : जिल्ह्यातील शेतीवाडीच्या मालमत्तेच्या मिळकतपत्रिकांसह भूमी अभिलेख व नगरभूमापन आदींकडील ब्रिटिशकालीन नकाशे जीर्ण होत आहेत. त्यांचे वेळीच जतन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये महसूल विभागाकडील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालमत्तेच्या आॅनलाइन ई-फेरफारनोंदी, भूमी अभिलेख, नगरभूमापनकडील नकाशांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी तब्बल ५७ लाख नऊ हजार ४७१ महत्त्वाच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कितीही वर्षांचे दस्तऐवज एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

राष्टÑीय भूमी अभिलेख अद्ययावत या केंद्र शासनाच्या योजनेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या महसूल विभागाच्या नियंत्रणातील शेतीच्या सातबाराच्या ई-फेरफारनोंद अद्ययावत केल्या जात आहेत. यामध्ये महसूल विभागाच्या शेतवाडीशी संबंधित ४४ लाख २२ हजार ५८० कागदपत्रांचे, तर भूमी अभिलेख व नगरभूमापन कार्यालयाच्या १२ लाख ८६ हजार ८९१ हजार नकाशांचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. त्यानंतर, लवकरच ई-फेरफार नोंंदी आणि मोठमोठे नकाशे संगणकीय डिजिटलायझेशनमुळे सहज उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, ते जीर्ण झाल्यामुळे त्यातील मजकूर कळत नसल्याच्या समस्येतूनदेखील कायमची सुटका होणार आहे.जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागाची तालुकापातळीवर सहा उपअधीक्षक कार्यालये कार्यरत आहेत. याशिवाय, नगरभूमापन अधिकाºयांची दोन कार्यालये असून, अशी एकूण आठ कार्यालये जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांच्या १३ प्रकारच्या मूळ अभिलेखांची संख्यात्मक माहिती सध्या तयार करण्यात आलेली आहे. त्यातील महत्त्वाचे सहा हजार ३०७ पुस्तके आहेत. दोन लाख २२ हजार चार शीट्स म्हणजे नकाशे प्राप्त झाले आहेत. याव्यतिरिक्त अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांची संख्या १३ लाख ३४ हजार ५७९ आहे. यासाठी या कागदपत्रांच्या स्कॅनिंगचे काम जवळजवळ पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.मिळकतपत्रिकांचे अद्ययावतीकरणमहसूल विभागाच्या फेरफार प्रक्रिया आॅनलाइन करण्यात येणार आहे. ईपीसीआयएस संगणक प्रणालीमध्ये सुमारे एक लाख ८१ हजार ७४७ मिळकतपत्रिकांचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. या मिळकतपत्रिकांच्या डाटा एडिटिंगचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. सध्या या ईपीसीआयएस आज्ञावलीमधून मिळकतपत्रिकेची प्रिंटआउट काढून तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या तपासणीच्या कामानंतर जिल्ह्यात आॅनलाइन फेरफार करण्यात येणार आहे.

टॅग्स :thaneठाणे