शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पालिकेच्या 'वर्षा' मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र, महिला गटात रविना गायकवाड विजेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 17:06 IST

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी दाखवला मॅरेथॉनला झेंडा

ठाणे: 'मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची' या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या एकतिसाव्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या एएसआयच्या धर्मेंद्र याने अव्वल स्थान पटकावले. त्याने ०१ तास ०७ मिनिटे आणि ४१ सेकंद वेळेसह २१ किमीचे अंतर पार केले. तर, महिला गटात नाशिकच्या रविना गायकवाड यांनी ०१ तास २५ मिनिटे आणि ४६ सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे २५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. तर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरविण्यात आले.

कोरोनापासून गेली पाच वर्षे खंडित झालेली ही स्पर्धा यंदा आबालवृद्धांच्या सहभागाने अत्यंत उत्साहात झाली. यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला. त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ३१व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार सकाळी आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर, टप्प्याटप्याने एकूण १२ गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला.

ठाणे वर्षा मॅरेथॉन थोड्या खंडानंतर आता पुन्हा होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. या क्षणी या मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सतीश प्रधान यांनी प्रकर्षाने आठवण होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनला प्रारंभ करून देताना सांगितले. ठाणे बदलतंय आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर ठाण्यातील तरुणाईलाही उर्जा देण्याचे काम ही मॅरेथॉन करत आहे. म्हणूनच 'मॅरेथॉन ठाण्याची…उर्जा तरुणाईची’असे घोषवाक्य घेतले आहे. तू धाव, तू धाव...घे क्षितिजाचा ठाव हे गाणेही अत्यंत प्रेरणादायी असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची ट्रायल रन होणार आहे. अंतर्गत मेट्रोचे कामही सुरू होत होत आहे. त्यामुळे ठाण्याचे रुप आणखी बदलेल. आपले ठाणे हरित होत आहे. यंदा दोन लाख झाडे लावण्याचा महापालिकेचा निश्चय केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • खेळाडूंचा सत्कार- याप्रसंगी, इंग्लड ते फ्रान्स हे सागरी अंतर पोहून जाणाऱ्या भारतीय संघातील जलतरणपटू आयुषी कैलास आखाडे, आयुष प्रवीण तावडे, मानव राजेश मोरे या जलतरणपटूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, आतंरराष्ट्रीय अॅथलिट शौर्या अविनाश अंबुरे आणि फुल्ल आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्मिता जावळे यांचाही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
  • घरोघरी तिरंगा प्रतिज्ञा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सगळयांनी याप्रसंगी, घरोघरी तिरंगा अभियानाच्या निमित्ताने मॅरेथॉनच्या व्यासपीठावर तिरंगा प्रतिज्ञा घेतली.
  • कॉर्पोरेट रन- महापालिका अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी एक कि.मी ची 'कॉर्पोरेट रन' ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत महापालिका अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांनी सहभाग घेतला.  त्याचप्रमाणे, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. त्याचबरोबर, दिव्यांगांच्या  त्रिदल समुहानेही या मॅरेथॉनमध्ये विशेष सहभाग घेतला.
  • एकूण १० लाखांची बक्षिसे- ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विविध १२ गटात झाली. विजेत्यांना एकूण १० लाख ३८ हजार ९०० रुपयांची  रोख पारितोषिके देण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली. २१ कि.मी स्पर्धेतील विजेत्यास एक लाखांचे रोख पारितोषिक, सन्माचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल

पुरुष खुला गट - अंतर २१ किमी

१. धर्मेंद्र, एसएसआय, पुणे२. अंकुश हक्के, सांगली३. कमलाकर देशमुख, नाशिक४. बेलिअप्पा एपी, एसएसआय, पुणे ५. सचिन यादव, मुंबई उपनगर६. राज तिवारी, मुंबई७. इश्वर झिरवाल, नाशिक८. धुलदेव घागरे, सांगली९. अमोल अमुने, सोलापूर१०. सिद्धेश बर्जे, रत्नागिरी

महिला खुला गट - अंतर २१ किमी

१. रविना गायकवाड, नाशिक२. आरती पवार, नाशिक३. साक्षी जड्याल, रत्नागिरी४. ऐश्वर्या खलाडकर, पुणे५. रुक्मिणी भोरे, पालघर६. अभिलाषा मोडेकर, पुणे७. प्रियांका पैकाराव, ठाणे८. प्रतिक्षा चोरमले, मुंबई९. आंचल मारवा, मुंबई१०. उर्मिला बने, मुंबई

पुरुष, १८ वर्षावरील, १० किमी

१. चैतन्य रुपनेर, सांगली२. अतुल बरडे, नाशिक३. वैभव शिंदे, नाशिक४. आशुतोष यादव, मुंबई५. प्रतिक डांगरे, पालघर६. मन्नू सिंग, ठाणे७. हितेश शिंदे, मुंबई८. हर्षा चौहान, मुंबई९. दत्ता आढाव, परभणी१०. सूरज झोरे, सातारा

महिला, १६ वर्षावरील, १० किमी

१. साक्षी भंडारी, अहिल्यानगर२. मानसी यादव, पुणे३. रिनकी पवार, नाशिक४. शेवंता पवार, धुळे५. आरती भगत, नागपूर६. मोनिका सिंग, मुंबई७. प्रियांका कुपते८. आदिती पाटील, ठाणे९. प्रियांका देवरे, नाशिक१०. जयश्री कुंजरा, पालघर

मुले, १८ वर्षाखालील, १० किमी

१. रोहित संगा२. विवेक शाह३. ओंकार सावंत४. आदित्य यादव५. कृष्णा जाधव६. आशिष गौतम७. अनुप प्रजापती८. विघ्नेश पाटील९. दुर्वेश पाटील१०. निशू शर्मा

मुले, १५ वर्षाखालील, ०५ किमी

१. आशिष राजबर२. रुद्र घाडगे३. कयान चव्हाण४. ओंकार भट५. सर्वेश लावंड६. आयान पिंजारी७. आर्यन वेखंडे८. हर्षवर्धन सुर्वे९. रोहीत राठोड१०. प्रतिक खानसोळे

मुली, १५ वर्षाखालील, ०५ किमी

१. अल्येस लोपेझ२. अल्विना मॅट्स३. श्रेया ओझा४. जस्लीन शैजू५. भक्ती कदम६. बुर्शा शेख७. मानसी कांबळे८. नेहा हलगरे९. वंशिका जंगम१०. प्रिती शहा

मुले, १२ वर्षाखालील, ०३ किमी

१. आराध्य पाटील२. रिधम साईल३. पवन वर्मा४. तेजप्रताप कुमार५. जेकब मेयन६. दक्ष दळवी७. सार्थक यादव८. अयन पांडे९. मारुती वर्मा१०. अर्णव अडसुळ

मुली, १२ वर्षाखालील, ०३ किमी

१. ओवी पाटील२. जान्हवी गुंजाळ३. अभिगेल गॅरजल४. आहाना निरंकारी५. रिया गोसावी६. तन्मयी भोईर७. स्तुती फातर्फेकर८. अद्विका घोळे९. अनन्या प्रसाद१०. अनघा भोईर

पुरुष - ६० वर्षांवरील, ०१ किमी

१. नारायण कंदमवार२. सुधाकर शिंदे३. एकनाथ पाटील४. अशोक भोगले५. पुनाजी सातव

महिला - ६० वर्षांवरील, ०१ किमी

१. आशा पाटील२. रेखा ताम्हाणेकर३. प्राची वाघ४. शुभांगी भोगले५. साधना दलाल

कॉर्पोरेट रन, अंतर ०१ किमी

१. दिलीप शिंदे२. प्रकाश साईल३. स्मिता काजवे४. हर्षल  पाटील५. श्रीकांत आंबाडे

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेMarathonमॅरेथॉन