मेडिकल सर्टिफिकेट अभावी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची अडचण वाढल्या

By पंकज पाटील | Published: April 19, 2023 03:48 PM2023-04-19T15:48:58+5:302023-04-19T15:51:46+5:30

संपूर्ण जिल्ह्यासाठी फक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना मान्यता; हजारो भाविकांना मेडिकल सर्टिफिकेट देण्याचा व्याप वाढला.

devotees going on the amarnath yatra problems increased due to lack of medical certificate | मेडिकल सर्टिफिकेट अभावी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची अडचण वाढल्या

मेडिकल सर्टिफिकेट अभावी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची अडचण वाढल्या

googlenewsNext

पंकज पाटील, अंबरनाथ: अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंची यंदाच्या वर्षी अडचण होणार आहे. कारण यात्रेसाठी लागणारे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देण्याचे अधिकार यंदा एका जिल्ह्यात फक्त एकाच डॉक्टरांना म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले आहे. यापूर्वी तालुका स्तरावरील सरकारी डॉक्टर सुद्धा हे सर्टिफिकेट देऊ शकत होते, त्यामुळे यात्रेकरूंना हे सर्टिफिकेट सहज मिळत होते.  मात्र यंदा हा नवीन नियम आल्याने आता प्रत्येक जिल्ह्यात फक्त सिव्हिल सर्जन, म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सकांनाच हे अधिकार असणार आहेत.  

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना आधी रजिस्ट्रेशन करावे लागते, आणि मगच यात्रेला जाण्याचे परमिट दिले जाते. हे परमिट देताना आधी सरकारी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून घेतलेला शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचा दाखला सुद्धा द्यावा लागतो. हा दाखला देण्याचे अधिकार मागच्या वर्षीपर्यंत ग्रामीण रुग्णालय, तालुका रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा होते. मात्र यंदा प्रत्येक जिल्ह्याच्या  जिल्हा शल्यचिकित्सकांनाच हे अधिकार देण्यात आले आहेत.  ठाणे जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना हे अधिकार देण्यात आले आहेत.

ठाणे जिल्ह्यातून दरवर्षी शेकडो भाविक अमरनाथ यात्रेसाठी जात असतात. यावर्षी या सर्व भाविकांना ठाण्याला जाऊन आपले मेडिकल सर्टिफिकेट आणावे लागेल, तरच या यात्रेकरूंना अमरनाथ यात्रेला जाण्याचे परमिट मिळेल. ही बाब वास्तविक दृष्ट्या अतिशय त्रासदायक असून दुसरीकडे इतक्या यात्रेकरूंची तपासणी करून त्यांना दाखला देणं ही जिल्हा शल्य चिकित्सकांसाठीही डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे तालुकास्तरावरील सरकारी डॉक्टरांना याबाबतचे अधिकार देण्याची मागणी यात्रेकरूंनी केली आहे. या सगळ्या गोंधळाबाबत ठाणे जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ. पवार यांना विचारले असता,या नवीन नियमांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसून सकाळपासून आपल्याला मेडिकल सर्टिफिकेटसाठी अमरनाथ यात्रेकरूंचे अखंड फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मेडिकल सर्टिफिकेट वर नेमके सही कोणाची लागणार हे आधीच जाहीर करणे गरजेचे आहे अमरनाथ यात्रेचे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावर आई त्यावेळेस आमचा गोंधळ उडत आहे. हजारो अमरनाथ यात्रेकरूंना ठाण्याला जाऊन मेडिकल सर्टिफिकेट घेणे हे अडचणीचे होणार आहे. एवढेच नव्हे तर मुख्य डॉक्टरांना देखील हा प्रकार त्रासदायक ठरणार आहे.  - एडवोकेट महेश शर्मा, अमरनाथ यात्रेकरू 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: devotees going on the amarnath yatra problems increased due to lack of medical certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.