शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

खड्ड्यातील दूषित पाणी आले ग्रामस्थांच्या नशिबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 02:06 IST

२० वर्षांपासून टंचाईचा करत आहेत सामना

- रोहिदास पाटील अनगाव : भिवंडी तालुक्यातील वळणाचापाडा, गवणीपाडा, दामूचापाडा, पागीपाडा या चार पाड्यांत पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न भेडसावत असतानाच तालुक्यातील गोदामपट्ट्यातील लोनाड ग्रुपग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील चौधरपाडा येथील बापदेवपाड्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. पाड्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.बापदेवपाड्यात १५ ते २० वर्षांपासून येथील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाड्याशेजारी खड्डा आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचलेले असते. ते पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने आरोग्यास धोकादायक असते. हे पाणी इतर कामासाठी वापरले जाते, तर पिण्यासाठी पाणी लांबून आणावे लागते. यामुळे महिलांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.येथील महिलांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार करून पाणीसमस्या दूर करण्याची मागणी केली आहे. पंचायतीने या पाड्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला, मात्र पाड्याच्या बाजूला असणाऱ्या काहींनी त्याला विरोध केल्याने येथील महिला आणि त्यांच्यामध्ये वाद झाल्याने पंचायतीने टँकरने पाणीपुरवठा बंद केल्याने येथील पाड्यातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा उपविभागाच्या वतीने या पाड्यात बोअरवेल का केली नाही. पाणीपुरवठा विभाग झोपला होता का, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. तालुका पाणीटंचाईमुक्त झाल्याचे कागदोपत्री दाखवणारे अधिकारी आपल्यावर कारवाईची वेळ आल्यावर पाणीटंचाईच नसल्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवतात. गेल्या वर्षी ‘लोकमत’ ने पाणीटंचाईचे विदरक सत्य मांडल्यावर पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राऊत व शाखा अभियंता भास्करराव यांनी पाणीटंचाई नसल्याचे जि.प. अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम समिती सभापती यांना सांगितले होते. मात्र, ‘लोकमत’ने वास्तव मांडल्याने पाणीपुरवठा विभागाला अखेर मान्यच करावे लागले. या विभागाला असे दुर्लक्षित गाव, पाडे का दिसत नाहीत, वर्षभर ते काय करतात, असा प्रश्न विचारला जात आहे.लोनाड ग्रुपग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील या पाड्यात टंचाईचे संकट आहेच. मात्र, या पाड्यात जाण्यासाठी साधा रस्ताही नाही. रस्ता नसल्याने येथील नागरिकांना येजा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तर, रुग्ण व मुलांना पावसाळ्याच्या दिवसांत शाळेत गुडघाभर चिखलातून पावसात जाण्याची वेळ येते. या पाड्यात रस्ता तर नाहीच. सार्वजनिक स्वच्छतागृहही नाही.गरोदरपणात माहेरीच राहावे लागतेपाणी नाही, त्यातच पाड्यात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गरोदर महिलेला माहेरी राहूनच प्रसूती करावी लागते. तिच्या पोटात दुखायला लागले, तर तिला रुग्णालयात नेण्यासाठी रस्ताच नाही, अशी माहिती वैशाली जाधव यांनी दिली.या पाड्यात पाण्याची समस्या गंभीर आहे. येथील महिलांनी पंचायतीकडे तक्र ार केली आहे. महिलांना सोबत घेऊन ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे नेले होते. त्यावेळी पाहणी करून ग्रामसेवकांनी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता. तो बंद केला आहे. तो पुन्हा सुरू न केल्यास श्रमजीवी संघटना आंदोलन करेल.- डॉ. स्वाती खान-सिंह, कार्यकर्ती, श्रमजीवी संघटनाबापदेवपाड्यात पाणीटंचाई आहे, हे खरे आहे. टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र, वाद झाल्याने बंद करण्यात आला आहे. लवकरच सुरू करण्याबाबत सरपंचांसह गटविकास अधिकारी यांना माहिती देणार आहे.- आर.डी. आंधळे, ग्रामविकास अधिकारी

टॅग्स :droughtदुष्काळbhiwandiभिवंडी