वृत्तपत्र टाकण्यास विरोध केल्यास कारवाई, सोसायट्यांना उपनिबंधकांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 12:04 AM2020-06-26T00:04:03+5:302020-06-26T00:04:35+5:30

सोसायट्यांची ही मनमानी लोकमतसह ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने ठाणे जिल्हाधिकारी, यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

Deputy Secretary warns societies against taking down newspaper | वृत्तपत्र टाकण्यास विरोध केल्यास कारवाई, सोसायट्यांना उपनिबंधकांनी दिला इशारा

वृत्तपत्र टाकण्यास विरोध केल्यास कारवाई, सोसायट्यांना उपनिबंधकांनी दिला इशारा

googlenewsNext

ठाणे : वृत्तपत्राद्वारे कोरोनाची लागण होत नाही, असे सरकारने स्पष्ट करुनही घरपोच वृत्तपत्र टाकण्यास मज्जाव करणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश दिले असल्याचे जिल्हा उपनिबंधक सयाजी पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे आता पेपरवाल्यास सोसायटीच्या आवारात प्रवेश न देण्याची आडमूठी भूमिका घेणाºयांवर कारवाईचा आसूड ओढला जाणार आहे.
वृत्तपत्र घरपोच देण्याला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, बहुतांशी गृहनिर्माण संस्थांकडून रहिवाशांच्या घरपोच वृत्तपत्र टाकण्याला विरोध केला जात आहे. सोसायट्यांची ही मनमानी लोकमतसह ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने ठाणे जिल्हाधिकारी, यांच्या निदर्शनास आणून
दिली आहे.
त्याची दखल घेऊन जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांनी घरपोच वृत्तपत्र वाटप करण्यास विरोध करू नये, असे फर्मान पाटील यांनी मंगळवारी जारी केले. ठाण्यातील वर्तकनगर, माजीवडा, तुळशीपाडा, मानपाडा रोड, वसंत विहार, बाळकुम, नौपाडा, पाचपाखाडी, लुईसवाडी आदी भागातील गृहनिर्माण सोसायट्या व टॉवर पेपरवाल्यास पेपर टाकायला मज्जाव करीत आहे.
>इतरांना दिला जातो प्रवेश
सोसायटीमधील अनेक रहिवासी खरेदीकरिता रस्त्यांवर बिनदिक्कत फिरत आहेत. दूध विक्रेत्यांसह भाजीपाला आणि अन्य विक्रेत्यांना प्रवेश दिला जात आहे. मात्र केवळ पेपरवाल्यांनाच सोसायटीत येण्यास अटकाव करीत असल्याने आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Deputy Secretary warns societies against taking down newspaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.