शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार: एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:48 IST

Deputy CM Eknath Shinde: जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडल्यानंतर उपमुख्यममंत्री एकनाथ शिंदे पत्रकाराची संवाद साधताना बोलत होते.

Deputy CM Eknath Shinde: सर्व विकासकामे नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण पूर्ण झाली पाहिजेत आणि १०० टक्के निधी खर्च झाला पाहिजे. कोणताही विभाग हलगर्जीपणा करत असल्यास संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडल्यानंतर ते पत्रकाराची संवाद साधताना बोलत होते.

ठाणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सन २०२६-२७ च्या वार्षिक योजनांना मंजुरी देण्यात आली असून सर्वसाधारण योजना ६६० कोटी, आदिवासी उपयोजना १४० कोटी, अनुसूचित जाती उपयोजना १०७ कोटी अशा तरतुदींसह सुमारे १७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.  तांत्रिक मान्यता, आराखडा तयार करणे, प्रस्ताव सादर करणे व निधी वेळेत खर्च करण्यावर भर देण्यात आला असून पीपीपी माध्यमातून होणाऱ्या कामांची विभागप्रमुखांनी प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता सुनिश्चित करावी असे निर्देश दिले.

पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट मोडवर

पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून रस्तेदुरुस्ती, खड्डे भरणे, डांबरी पॅचवर्क मे अखेरपर्यंत पूर्ण करावे, नागरिकांना गैरसोय होऊ नये व अपघात टळावेत यासाठी खबरदारी घ्यावी असे आदेश देण्यात आले. धोकादायक इमारतींना क्लस्टर पुनर्विकासात प्राधान्य देण्यास सांगण्यात आले असून जिल्हाधिकारी, महापालिका, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यांच्यात समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नासाठी कायमस्वरूपी शेल्टर उभारणे, निर्बीजीकरण आणि ॲनिमल ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर विशेष लक्ष ठेवून साथीचे आजार टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क राहावी असे सांगण्यात आले तसेच सिव्हिल हॉस्पिटल लवकर सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यास सांगण्यात आले असून शेणखत स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, कुरण लागवड व नाविन्यपूर्ण शेती प्रयोगांना चालना द्यावी अशा सूचना शिंदे यांनी दिल्या. शाहापूर परिसरातील प्रगत शेती पद्धतींचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे अंतर्गत मेट्रोचा डीपीआर मंजूर झाला असून लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, वॉटर टॅक्सी, छेडा नगर ते गायमुख एलिव्हेटेड रस्ता, साकेत-कोलशेत-मीरा भाईंदर जोडणी, नाशिक रोड फ्लायओव्हर आदी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधून खारेगाव पूल लवकर सुरू करण्यात येणार असून मेट्रो प्रकल्पातील अडचणी सोडवण्याचा पाठपुरावा सुरू आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Accelerating Road, Metro, Water Projects; Action Against Negligence: Eknath Shinde

Web Summary : Eknath Shinde directed officials to expedite road, metro, and water projects, emphasizing quality and fund utilization. He warned of action against negligence. Approvals were granted for Thane district's annual plans, focusing on infrastructure improvements, disaster preparedness, and agricultural development, including organic farming and resolving traffic issues.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाthaneठाणे