प्रेम संबंधास नकार: महिलेचे फोटो व्हायरल करणाऱ्यास अवघ्या काही तासांमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 19:53 IST2019-08-02T18:53:57+5:302019-08-02T19:53:47+5:30

कासारवडवली भागात राहणा-या २५ वर्षीय महिलेशी आधी मैत्री करुन नंतर तिला त्याने प्रेमाच्या जाळयात ओढले. याचाच गैरफायदा घेत त्याने तिच्याकडे ७० हजार रुपयांची मागणी करीत ते त्याच्या बँक खात्यात भरण्यास तसेच रोख स्वरुपात देण्यास भाग पाडले. पैसे आणि प्रेमसंबंधालाही तिने नकार दिल्यानंतर मात्र त्याने त्यांचे एकांतवासातील फोटोही व्हायरल केले.

 Denying a love affair: Accused arrested for viral photos within 6 hours | प्रेम संबंधास नकार: महिलेचे फोटो व्हायरल करणाऱ्यास अवघ्या काही तासांमध्ये अटक

ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देठाण्याच्या कासारवडवली पोलिसांची कारवाईदोघांच्या एकांतवासातील फोटोही केले व्हायरल वारंवार होणा-या पैशांच्या मागणीमुळेच तिने तोडले होते संबंध

ठाणे: प्रेम संबंध ठेवण्यास तसेच पैसे पुरविण्यास नकार दिल्याने फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवर महिलेचे फोटो व्हायरल करणा-या व्यंकटेश पेंटा (२४, रा. बोरीवली) याला अवघ्या सहा तातांमध्ये अटक करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे. त्याला ५ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कासारवडवली भागात राहणाºया २५ वर्षीय महिलेशी आधी मैत्री करुन नंतर तिला त्याने प्रेमाच्या जाळयात ओढले. याचाच गैरफायदा घेत त्याने तिच्याकडे ७० हजार रुपयांची मागणी करीत ते त्याच्या बँक खात्यात भरण्यास तसेच रोख स्वरुपात देण्यास भाग पाडले. त्याच्याकडून होणाºया शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे तसेच दिवसेंदिवस त्याची पैशांचीही मागणी वाढत असल्याच्या कारणावरुन या महिलेने त्याच्याशी प्रेमसंबंध तोडले होते. त्याच्याशी असलेले हे प्रेमसंबंध तोडल्याने आणि त्यास पैसे पुरविण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन व्यंकटेश याने फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅप या सोशल मिडियाच्या माध्यमातून माध्यमांद्वारे त्यांच्या दोघांचे काही खासगी फोटोही व्हायरल केले. तिचे फोटो व्हायरल करुन त्याने बदनामी केल्याने याप्रकरणी तिने ३० जुलै २०१९ रोजी विनयभंग, खंडणी, बदनामी करणे आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. तिने त्याच्याशी पुन्हा प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यासाठी तसेच पैशांच्या मागणीसाठी या महिलेकडे वारंवार संपर्क करीत होता. या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप उगले, निरीक्षक वैभव धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव, उपनिरीक्षक विनायक निंबाळकर, पोलीस हवालदार राजेंद्र चौधरी, सुजित खरात, विश्वनाथ ध्रुवे आणि मनोजकुमार पवार आदींच्या पथकाने त्याला ३१ जुलै रोजी अटक केली. त्याने या गुन्हयाची कबूली दिली असून या संपूर्ण प्रकारामध्ये त्याचा सक्रीय सहभाग असल्याचेही उघड झाले. त्याने आणखी काही महिलांना अशाच प्रकारे फोटो व्हायरल करण्याचील धमकी दिली का? आणखी कोणाला प्रेमाच्या जाळयात ओढून त्यांना ब्लॅकमेल केले आहे का? याबाबत तपास सुरु असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.

 

Web Title:  Denying a love affair: Accused arrested for viral photos within 6 hours