शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

कामगार रुग्णालयाची जुनी इमारत पाडण्यास सुरुवात, उल्हासनगरात उभे राहणार अद्यावत कामगार रुग्णालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 17:47 IST

Ulhasnagar News: धोकादायक कामगार रुग्णालयाच्या जागी नवीन अद्यावत रुग्णालय उभारणीला मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे, महापौर लिलाबाई अशान यांनी दिली.

- सदानंद नाईक उल्हासनगर : धोकादायक कामगार रुग्णालयाच्या जागी नवीन अद्यावत रुग्णालय उभारणीला मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे, महापौर लिलाबाई अशान यांनी दिली. रुग्णालयाच्या पुनर्बांधणी साठी गेल्या ६ वर्षा पासून खासदार प्रयत्नशिल होते. तसेच रुग्णालयाची जुनी इमारत पाडकामास सुरवात झाली. (The demolition of the old building of the workers 'hospital has started, and a modern workers' hospital will be set up in Ulhasnagar)

 उल्हासनगर परिसरातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरात कारखान्याची संख्यां मोठी असून दीड लाखा पेक्षा जास्त कामगार काम करीत आहेत. सन-१९७१ पासून उभ्या असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीची देखभाल व्यवस्थित न झाल्याने, काहीं वर्षांपासून रुग्णलाय इमारतीसह व डॉक्टर व इतर कामगारांची निवासस्थानें धोकादायक झाली. त्यानंतर रुग्णालयाच्या पुनर्बांधणीची मागणी सर्वस्तरातून झाली. काही वर्षांपूर्वी या रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल मुंबई आय.आय.टी. कडून आल्यानंतर. मोडकळीस आलेल्या रुग्णालय इमारतीच्या जागी नवीन अद्यावत रुग्णालय उभे रहावे. ह्यासाठी केंद्राकडे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करून रुग्णालयासाठी १०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.

कामगार रुग्णालयाच्या पुनर्बांधणी साठी १०२ कोटीचा निधी मंजूर झाल्यानंतर, सन २०१९ मध्ये खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र सद्यास्थितीत असेलेले कामगार रुग्णालय स्थलांतरित करणे गरजेचे होते. त्याला मुहूर्त निघाल्यावर कामगार रुग्णलायाची धोकादायक झालेली इमारत जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली. १०० बेडच्या या रुग्णालया करीता १ लाख ८० चौरस फूट क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यातील अंदाजे १ लाख २२ चौरस फूट क्षेत्र हे रुग्णालयासाठी व उर्वरित रुग्णालयात पुर्णवेळ डाँक्टर व कर्मचाऱ्यां साठी निवासी व्यवस्था असणार आहे. रुग्णालयाच्या दुमजली इमारतीत स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग, फार्मसी, शस्त्रक्रिया विभाग आदी अत्याधुनिक सुविधा रुग्णालय असणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान यांनी दिली. 

कामगार रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचे श्रेय शिवसेनेला शहरातील कामगार रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला असून रुग्णलायच्या बैठकीला डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना नेते धनंजय बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक अरुण अशान व नगरसेवक, चंद्रकांत बोडारे, ईएसआयसीचे संचालक प्रणय सिन्हा, सिनिअर मेडिको डॉ. कांबळे, उपसंचालक आशुतोष गिरी, उपवैद्यकीय प्रतिनिधी सतीश ताजवे यांच्यासह ईएसआयसीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. एकूणच पुनर्बांधणीचे श्रेय शिवसेनेला जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरhospitalहॉस्पिटलShrikant Shindeश्रीकांत शिंदे