शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाच्या कंटेनर शाखांचे पाडकाम; राष्ट्रवादीची कार्यालयेही लक्ष्य, मीरा-भाईंदर पालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 05:52 IST

आचारसंहिता लागताच राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयांवर कारवाई सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी लागू होताच मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने शिवसेना शिंदे गटाच्या कंटेनर शाखांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनधिकृत कार्यालयांचे पाडकाम सुरू केले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भाईंदर पूर्व भागात एकाच दिवशी शिंदे गटाच्या सहा कंटेनर शाखा सुरू झाल्या. या बेकायदा कंटेनर शाखांविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी कारवाईची मागणी केली होती. तक्रारींनंतरही आयुक्त संजय काटकर यांनी सर्वच क्षांच्या अनधिकृत कार्यालयांवर  कारवाई करणार, अशी भूमिका घेतली होती. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच पालिकेचे उपायुक्त, प्रभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयांवर कारवाई सुरू केली. 

  भाईंदर पूर्वेच्या महात्मा जोतिबा फुले (केबिन रोड) मार्गावरील इंद्रलोक नाका, सचिन तेंडुलकर मैदानाजवळ, गोल्डन नेस्ट-आझादनगर येथील व मीरारोडच्या मीनाताई ठाकरे सभागृहाजवळील पालिकेच्या रस्ता-पदपथ आदी सार्वजनिक असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कंटेनर शाखांवर शनिवारी पालिकेने कारवाई केली. मीरारोडच्या हाटकेश भागातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनधिकृत कार्यालयावरही पालिकेने कारवाई केली.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस