नोकरी टिकवण्यासाठी महिला सुरक्षा रक्षकाकडे केली शरीरसुखाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 10:35 PM2019-07-30T22:35:55+5:302019-07-30T22:41:26+5:30

सहकारी सुरक्षारक्षकानेच चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील टिकुजिनीवाडी या रिसॉर्टमध्ये २५ जुलै रोजी सायंकाळी घडला आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात रणविरसिंग सणमेदा याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून व्यवस्थापनाने सुधारणा न केल्यास मनसे स्टाईलने धडा शिकविण्याचा इशारा मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे.

 Demands for sexual relation to female security guard to keep her job | नोकरी टिकवण्यासाठी महिला सुरक्षा रक्षकाकडे केली शरीरसुखाची मागणी

ठाण्याच्या टिकुजिनीवाडी येथील धक्कादायक प्रकार

Next
ठळक मुद्देठाण्याच्या टिकुजिनीवाडी येथील धक्कादायक प्रकारसुरक्षा रक्षक एजन्सी बदलणार असल्याचा केला होता दावाव्यवस्थापनाने सुधारणा न केल्यास मनसे स्टाईलने धडा शिकविण्याचा इशारा

ठाणे: सुरक्षारक्षक एजन्सी बदलणार असल्याने नोकरी टिकविण्यासाठी महिला सुरक्षा रक्षकाकडे सहकारी सुरक्षारक्षकानेच चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील टिकुजिनीवाडी या रिसॉर्टमध्ये २५ जुलै रोजी सायंकाळी घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेशी गैरवर्तन गैरवर्तन करून धमकावत विनयभंग केल्याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात रणवीरसिंग सणमेदा (५४) रा.आनंदनगर या सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवस्थापनाने याबाबत योग्य भूमिका न घेतल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशारा मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे.
घोडबंदर रोडवरील मानपाडा येथे टिकुजिनी वाडी येथे काम करणारी ३२ वर्षीय एक सुरक्षारक्षक महिला प्रवेशद्वारावर पर्यटकांची तपासणी करण्याचे काम करते. याच ठिकाणी सणमेदा रा.आनंदनगर हा देखील सुरक्षारक्षकाचे काम करतो. महिनाभरापूर्वी पाच वर्षीय मुलगी घरात शिडीवरून पडल्याने तिच्या उपचारासाठी तिने सणमेदा यांच्याकडून उसनवारीने ३५० रु पये घेतले होते. काही दिवसात ही उसनी रक्कम तिने परत केली. त्यानंतर २५ जुलै २०१९ रोजी सायंकाळी प्रवेशद्वारावर कर्तव्य बजावत असताना सणमेदा याने तिला स्वच्छतागृहाकडे बोलविले. तसेच,येथील सुरक्षारक्षक एजन्सी बदलणार असून तुला नोकरी टिकवायची असेल तर,आपल्याशी शरीरसंबंध ठेव. लॉजवर जाऊ, असे प्रलोभनही दाखविले. याला तिने स्पष्ट नकार देताच त्याने तिच्याशी लगट करीत तिच्या गणवेशाची बटन्सही तुटली. हा प्रकार तिथे कामावर असलेल्या अन्य एका सुरक्षारक्षकानेही पाहिला. दरम्यान, पीडितेने सुरक्षारक्षक एजन्सीचे कार्यकारी अधिकारी सुयोग्य बारवकर यांच्याकडे दाद मागितल्यावर तातडीने चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी याबाबत वेळीच हस्तक्षेप करून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष पाचंगे यांनी केली आहे.
टिकुजिनी वाडीचा कारभार सुधारा- मनसे
ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजीनी वाडी हे पर्यटनस्थळ नावाजले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी बेशिस्त कारभार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. येथील महिला कर्मचारी तसेच पर्यटक यांच्याशी गैरवर्तणूक केल्याचे प्रकार घडूनही त्याकडे व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे. ज्या इम्पिरियल या मराठी माणसाच्या सुरक्षारक्षक कंपनीला चार महिन्यांपूर्वी सुरक्षारक्षक पुरविण्याचा ठेका दिला. त्याला कोणतेही ठोस कारण न देता त्याचे कंत्राट तडकाफडकी रद्द केले आहे. त्यामुळे शेकडो मराठी कामगार बेरोजगार झाले. तेव्हा टिकुजिनीवाडी व्यवस्थापनाच्या या मराठीद्वेष्ट्या भूमिकेला मनविसेने प्रखर विरोध दर्शवला असून व्यवस्थापनाने याबाबत योग्य भूमिका न घेतल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशारा पाचंगे यांनी दिला आहे.

Web Title:  Demands for sexual relation to female security guard to keep her job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.