अश्लील व्हिडीओ व्हायरल करून पैश्यांची मागणी
By धीरज परब | Updated: March 2, 2025 00:03 IST2025-03-02T00:02:27+5:302025-03-02T00:03:05+5:30
Mira Road Crime News: एका तरुणाचा त्याच्या परिचित तरुणीने अश्लील व्हिडीओ व्हायरल करून १५ हजार रुपयांची मागणी केल्या बद्दलचा गुन्हा काशीमीरा पोलिसांनी दाखल केला आहे.

अश्लील व्हिडीओ व्हायरल करून पैश्यांची मागणी
मीरारोड - एका तरुणाचा त्याच्या परिचित तरुणीने अश्लील व्हिडीओ व्हायरल करून १५ हजार रुपयांची मागणी केल्या बद्दलचा गुन्हा काशीमीरा पोलिसांनी दाखल केला आहे.
मीरारोडच्या रॉयल महाविद्यालय जवळ रोज गार्डनमध्ये राहणार अनुराग संजय मिश्रा ( वय २५ वर्ष ) हा शिक्षण घेत असून त्याच्या परिचित माही मिश्रा हिने अनुरागचा अश्लील व्हिडिओ काढला होता. तो व्हिडीओ माही हिने अनुरागच्या मित्र व नातेवाईक, फॉलोअर्स यांना तिच्या इंस्टाग्राम आयडी वरून पाठवला . व्हायरल केलेल्या व्हिडिओचा स्क्रिनशॉट माही ने अनुराग ला पाठवला असता अनुराग याने व्हिडीओ व्हायरल करू नकोस अशी तिला विनवणी केली.
पाठवून मधील फॉलोवर्स यांना पाठविला त्यानंतर महिने तुझा व्हिडिओ काही लोकांना पाठवून व्हायरल केला असल्याचा स्क्रीन शॉट अनुराग मित्राला पाठवला त्यावर अनुराग याने व्हिडिओ व्हायरल करू नको अशी विनंती केली. तिने भास्कर निर्मलकर या नावाच्या बँक खात्यावर १५ हजार रुपये पाठवण्यास सांगितले. तात्काळ पैसे पाठवले नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिने दिली. याप्रकरणी अनुराग मिश्राच्या फिर्यादीवरून काशीमीरा पोलिसांनी माही मिश्रा आणि अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक शितल मुंडे तपास करत आहेत.