अंबरनाथमध्ये अनियमित पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याची मागणी
By पंकज पाटील | Updated: September 23, 2022 18:14 IST2022-09-23T18:14:40+5:302022-09-23T18:14:47+5:30
पावसाळा असल्याने पावसाच्या पाण्याचा नागरिकांना नाईलाजाने वापर करावा लागतो.

अंबरनाथमध्ये अनियमित पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याची मागणी
अंबरनाथ: पावसाळा असूनही अंबरनाथच्या पूर्व भागात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने अंबरनाथच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयावर परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले.
अंबरनाथच्या पूर्व भागातील ताडवाडी, हाल्याचा पाडा, अश्विनी हॉस्पिटल परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित आणि अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ भाजपाचे पदाधिकारी सर्जेराव माहूरकर यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या देण्यात आला होता.
पावसाळा असल्याने पावसाच्या पाण्याचा नागरिकांना नाईलाजाने वापर करावा लागतो. याशिवाय कधी कधी टँकर मागवावे लागतात याबाबत माहूरकर यांनी संताप व्यक्त केला. पाणी टंचाईच्या समस्येवर लवकरच तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा माहूरकर यांनी मजीप्राच्या अधिकाऱ्यांना दिला.