शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

उत्तन भागात निर्माण होणाऱ्या मत्स्य कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 17:04 IST

भार्इंदरच्या उत्तन ते चौक दरम्यानच्या मच्छीमारांना मिळणा-या मासळी पैकी त्यातली खराब मासळी वा मासळीतील टाकाऊ अवयवांचा रोजचा सुमारे ५ टन कचरा निर्माण होत असल्याचा दावा करत उत्तनच्या कोळी जमात संस्थेने सदर कच-याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावण्याची मागणी चालवली आहे.

 मीरा रोड  - भार्इंदरच्या उत्तन ते चौक दरम्यानच्या मच्छीमारांना मिळणा-या मासळी पैकी त्यातली खराब मासळी वा मासळीतील टाकाऊ अवयवांचा रोजचा सुमारे ५ टन कचरा निर्माण होत असल्याचा दावा करत उत्तनच्या कोळी जमात संस्थेने सदर कच-याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावण्याची मागणी चालवली आहे.कोळी जमात संस्थेचे पाटील कलमेत गौरया व त्यांच्या सहकारयांनी या बाबतचा एक तक्ता बनवला आहे. जमातीने तयार केलेल्या तक्त्या नुसार उत्तन ते चौक किनारपट्टी वर मच्छीमारांच्या २२५ मोठ्या बोटी , ३७० जाळीवाल्या बोटी तर २५५ लहान बोटी अशा मिळुन एकुण ८५० मासेमारी बोटी आहेत.मोठ्या २२५ बोटीं पैकी दिवसाला दिडशे बोटी मासळी घेऊन आल्या तर एक बोट सुमारे १० टन मासळी आणते. दिडशे बोटीं नुसार दिवसाला दीड हजार टन मासळी येते . त्यातील १२५ टन मासळी विक्री साठी तर ११०० टन सुकवण्यासाठी जाते. तर २७५ टन मासळी ही जेवणा साठी, खतासाठी , भेट म्हणुन वापरली जाते. त्यात खराब मासळी देखील असते.जाळीवाल्या ३७० बोटीं पैकी १२५ बोटी दिवसाला मासळी घेऊन आल्या तर प्रती बोट टन प्रमाणे १२५ टन मासळी येते. त्यातील ११८ टन विक्री साठी तर ७ टन मासळी जेवणासाठी, भेट आदी साठी वापरली जाते. २५५ लहान बोटीं पैकी दिवसाला २०० बोटी मासळी घेऊन आल्या तर प्रती बोट ५०० किलो मासळी नुसार १०० टन मासळी येते. त्यातील २० टन मासळी बाहेर विक्रीसाठी तर ७० टन मासळी सुकवली जाते. शिवाय १० टन मासळी ही जेवणासाठी, खतासाठी वापरली जाते.म्हणण्या नुसार एकुण आलेल्या रोजच्या १७०० टन ओली मासळी पैकी ११७० टन मासळी सुकवली जाते. २६३ टन मासळी विक्री साठी नेली जाते. तर उरलेल्या २६७ टन मासळी पैकी २१० टन मासळी खता साठी ; ५७ टन मासळी खाण्यासाठीतर ५ टन मासळीची आतडी, कुजलेली मासळी वा भाग आदी किनारयावर किंवा अन्यत्र फेकला जातो.किनारयावर टाकलेला हा मासळीचा कचरा जर भरतीच्या पाण्याने वाहुन गेला नाही तर किनारयावर पदुन कुजतो व त्यात किडे पडतात. दुर्गंधी पसरते असे हॅन्ड्री गंडोली यांनी सांगीतले. सदर ५ टन मासळीच्या कचरया प्रश्नी महापालिकेने लक्ष देऊन त्याची विल्हेवाट लावावी या साठी आम्ही आयुक्तांना भेटणार होतो. सभागृह नेते रोहिदास पाटील देखील सोबत होते. पण त्यांना अचानक जावे लागल्याने आमची आयुक्तां सोबतची भेट होऊ शकली नाही असे गंडोली यांनी सांगीतले. आम्ही पुन्हा आयुक्तांची वेळ घेऊन या मासळीच्या कचरया बद्दल बोलणार आहोत असे ते म्हणाले.मच्छीमार नेते बर्नड डिमेलो म्हणाले की, मासळीचा कुठलाही भाग मच्छीमार वाया जाऊ देत नाही. पावसाळ्यात मासळीच्या कचरयाचा थोडाफार प्रश्न निर्माण होतो. पालिकेने व शासनाने मच्छीमारांना मासळी सुकवण्यासाठी जागा उपलबध्द करुन द्यावी. त्याच सोबत टाकाऊ मासळी वा त्याचा भाग सुकवण्यासाठी जागा दिल्यास चांगलं कुटा खत जास्त प्रमाणात तयार करता येईल. पालिकेने सदरचे खत खरेदी करावे अशी मागणी डिमेलो यांनी केली आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारmira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदर