शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील एमजीनरेगाची २७ कोटींची कामे सुरू होण्यास विलंब; ग्रामस्थांची कामासाठी शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 19:10 IST

यंदाच्या पावसाने वेळी आधीच इक्क्षीट घेतली आहे. यामुळे खरीपाची कामे शेतकऱ्यांनी केली नाही. बहुतांशी शेतकऱ्यांनी भात कापणीसह अन्यही कामे घरच्या घरीच केली. यामुळे भिवंडी, मुरबाड, शहापूर या ग्रामीण तालुक्यांमधील शेतमजूरांच्या हाताला कामे मिळाले नाही. त्यांनी गावात कसा तरी दिवाळीपर्यंत उदरनिर्वाह केला आणि आता त्यांनी कामाच्या शोधात गावे सोडली आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने आधीच वर्षभरासाठी सुमारे २७ कोटींच्या कामांचे नियोजन केले आहे. करूनही ते आजपर्यंत सुरू केले नसल्यामुळे त्यांना अन्यत्र जावे लागत असल्याचे सामाजिक संघटनांकडून सांगितले जात आहे

ठळक मुद्देसुमारे ४८ हजार ७७४ कामांचे नियोजन सुमारे २६ कोटी ९३ लाख रूपये खर्च जिल्हा प्रशासनाने सुमारे ८६ लाख मनुष्य दिन कामांची निर्मिती केली

ठाणे : यंदा महात्मा गांधी राष्ट्रीय  ग्रामीण रोजगार हमीच्या (एमजीनरेगा) सुमारे ४८ हजार ७७४ कामांचे नियोजन जिल्ह्यात केले आहे. त्यावर सुमारे २६ कोटी ९३ लाख रूपये खर्च होणार आहे. मात्र पावसाळा संपल्यानंतर या कामांना जिल्ह्यात कोठेही सुरूवात झाली नाही. यामुळे ग्रामस्थांकडून कामांची शोधाशोध सुरू झाली आहे. तर बहुतांशी शेत मजूर गावे सोडून अन्यत्र मोठ्यासंखेने जात आहेत.यंदाच्या पावसाने वेळी आधीच इक्क्षीट घेतली आहे. यामुळे खरीपाची कामे शेतकऱ्यांनी केली नाही. बहुतांशी शेतकऱ्यांनी भात कापणीसह अन्यही कामे घरच्या घरीच केली. यामुळे भिवंडी, मुरबाड, शहापूर या ग्रामीण तालुक्यांमधील शेतमजूरांच्या हाताला कामे मिळाले नाही. त्यांनी गावात कसा तरी दिवाळीपर्यंत उदरनिर्वाह केला आणि आता त्यांनी कामाच्या शोधात गावे सोडली आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने आधीच वर्षभरासाठी सुमारे २७ कोटींच्या कामांचे नियोजन केले आहे. करूनही ते आजपर्यंत सुरू केले नसल्यामुळे त्यांना अन्यत्र जावे लागत असल्याचे सामाजिक संघटनांकडून सांगितले जात आहे.गावखेड्यातील मागेल त्यास काम देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे ८६ लाख मनुष्य दिन कामांची निर्मिती केली आहे. त्यातून ४८ हजार ७७४ कामे मजुरांकडून करून घेण्याचे नियोजनही केले. मात्र पावसाने दडी मारल्यानंतर प्रशासनाने या नियोजनामधील कामे हाती घेण्याची गरज होती. परंतु त्यास अद्यापही प्रारंभ झालेला नाही. यामुळे जिल्ह्यात सध्या रोजगार समस्या गंभीर होत आहे. यावर गांभीर्याने लक्ष केंद्रीत करून जिल्हा परिषदेसह कृषी विभाग, बांधकाम, पाणी पुरवठा, लघू पाटबंधारे, वन विभाग आणि ग्राम पंचायत यंत्रणेने त्यांच्या नियोजनाप्रमाणे एमजीनरेगाची कामे सुरू करण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून होत आहे.या कामांमुळे ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील मजूर स्वत:च्या गावी काम करून आर्थिक सुबत्ता मिळवण्याची अपेक्षा आहे. या कामांच्या विलंबाने आदिवासी, दुर्गम भागातील मजूर मुंबईसह गुजरात परिसरात वीटभट्टी, रेती उत्खनन, दगडखाणीच्या कामासाठी स्थलांतरीत होत आहेत. या मजुरांच्या हाताल काम देण्यासाठी पाणी टंचाईच्या कामांसह शेततळे, गावतळे, रस्ते, गोठे, फळबागा लागवड, रोपवाटीका, शौचालये, घरकूले आदी सुरू होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद