कौटुंबिक वादातून दिव्यात दिराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 03:20 IST2018-03-16T03:20:58+5:302018-03-16T03:20:58+5:30

कौटुंबिक वादातून दिराची हत्या केलेली भावजय, पुतण्या, पुतणी आणि जावई यांना मुंब्रा पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली. दिव्यातील सिद्धिविनायकनगर येथील शिवकृपा चाळीतील बबन अडसूळ यांची आई विठाबाई आणि नातजावई जयराज यांच्यात रूमच्या मालकीहक्कावरून मस्करीत वादावादी झाली.

 Deepa murder in the family dispute | कौटुंबिक वादातून दिव्यात दिराची हत्या

कौटुंबिक वादातून दिव्यात दिराची हत्या

मुंब्रा : कौटुंबिक वादातून दिराची हत्या केलेली भावजय, पुतण्या, पुतणी आणि जावई यांना मुंब्रा पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली.
दिव्यातील सिद्धिविनायकनगर येथील शिवकृपा चाळीतील बबन अडसूळ यांची आई विठाबाई आणि नातजावई जयराज यांच्यात रूमच्या मालकीहक्कावरून मस्करीत वादावादी झाली. त्यामुळे संतप्त झालेली विठाबाई पनवेलला तिची दुसरी सून नंदा हिच्याकडे गेली. तेथून नंदा, तिचा मुलगा विशाल, मुलगी संगीता खामकर, जावई प्रदीप खामकर आणि रेश्मा कांबळे सोमवारी पुन्हा दिव्यात आले. त्यांनी बबनसह त्याची पत्नी रंजना आणि मुलगा सागर यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या बबनचा उपचारादरम्यान मुंब्य्रातील खाजगी रूग्णालयात मृत्यू झाला. याबाबतची तक्र ार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिताफीने तपास करून हत्येत सहभागी असलेल्या नंदासह तिचा मुलगा विशाल, मुलगी संगीता, जावई प्रदीप आणि रेश्मा या पाच जणांना १२ तासांतच मंगळवारी अटक केली. पुढील चौकशीसाठी न्यायालयाने त्यांना १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पासलकर यांनी दिली.

Web Title:  Deepa murder in the family dispute