कल्याण पूर्वेतील अतिक्रमणे हटवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 03:27 IST2018-08-30T03:26:34+5:302018-08-30T03:27:05+5:30
केडीएमसीच्या अतिक्रमण हटाव विभागाने मंगळवारपासून पत्रीपूल ते टाटा पॉवर कंपनीपर्यंतच्या परिसरात धडक कारवाई सुरू केली आहे

कल्याण पूर्वेतील अतिक्रमणे हटवली
कोळसेवाडी : केडीएमसीच्या अतिक्रमण हटाव विभागाने मंगळवारपासून पत्रीपूल ते टाटा पॉवर कंपनीपर्यंतच्या परिसरात धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत रस्त्यावर भंगारावस्थेत उभी असलेली सात चारचाकी वाहने, १७ दुचाकी वाहने उचलून नेण्यात आली. तर, महापालिकेने ३३ हातगाड्या आणि ३५ शेड जमीनदोस्त केल्या.
केडीएमसीचे ‘जे’ प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे, ‘ई’चे शरद पाटील आणि ‘आय’चे रवींद्र गायकवाड, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक एस.जे. शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तीन क्रेन, चार डम्पर, एक जेसीबी तसेच कंत्राटदाराचे २५ मजूर आणि महापालिकेच्या ३० कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.