शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

मुझफ्फर यांच्या भावाच्या भाजपप्रवेशाने वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:15 AM

मेहतांची अडचण वाढणार : २० वर्षांपूर्वीच कुटुंबाने केले मुनावर यांना दूर

मीरा रोड : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी काँग्रेस नेते तथा माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचे भाऊ मुनावर यांचा भाजपप्रवेश घडवून आणण्याचा चालवलेला प्रचार त्यांच्याच अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. कारण, मुझफ्फर यांच्या वडिलांनी मुनावर यांना २० वर्षांपूर्वीच कुटुंबातून दूर केले असून, तेव्हापासून मुझफफर यांच्याशी संपर्कच नाही. त्यातच मुनावर यांच्यावर अनधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेने गुन्हा दाखल केला असून, त्यांचे पुनर्विकासाचे काही प्रकल्पदेखील बारगळल्याने लोकांमध्ये संताप आहे. त्यामुळे मुनावर यांच्या प्रवेशाने मेहतांचीच अडचण वाढण्याची शक्यता आहे.

मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून यंदा काँग्रेसच्या वतीने माजी आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडीच्या वतीने सदर मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याचे जाहीर करून मुझफ्फर यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे मुझफ्फर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी चालवली आहे. दुसरीकडे, भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना मुझफ्फर हे प्रतिस्पर्धी ठरणार असल्याने मेहतांनीदेखील स्वत: आणि नगरसेवकांच्या माध्यमातून मुझफ्फर यांच्या उमराव ट्रस्टचे रुग्णालय लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे आणि काँग्रेस समर्थक नगरसेवकांनासुद्धा फोडण्याचे प्रयत्न मेहतांनी चालवले असून, नरेश पाटील व अमजद शेख यांना फोडण्यात ते यशस्वी ठरले आहेत. परंतु, मुनावर ऊर्फ मुन्ना हुसेन यांचा भाजपप्रवेश घडवून आणत मेहता यांनी शहरात काँग्रेस नेते मुझफ्फर यांचा भाऊच भाजपमध्ये आल्याचा जोरदार प्रचार चालवला आहे. यातून मुझफ्फर व त्यांच्या कुटुंबीयांना धक्का देण्याचा प्रयत्न मेहतांनी केलाय. परंतु, मुनावर यांच्या भाजपप्रवेशामागे केवळ राजकीयच नव्हे तर आर्थिक समीकरणेदेखील जुळल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

कारण, हुसेन कुटुंबीयांना जवळून ओळखणाऱ्यांना मुनावर यांची वस्तुस्थिती माहिती आहे. १९९५ च्या दरम्यान सय्यद नजर हुसेन यांनी मुनावर यांच्या गोष्टी न पटल्याने त्यांना कुटुंबातून दूर केलेले आहे. तेव्हापासून मुझफ्फर यांनीदेखील मुनावर यांच्याशी राजकीय वा व्यावसायिक तर सोडाच, पण कौटुंबिक संबंध पण ठेवलेले नाहीत. त्याला कारणेदेखील आहेत. मुळात मुनावर काँग्रेस वा अन्य राजकीय पक्षात नव्हते. ते मीरा रोडमध्ये राहतदेखील नाहीत. उलट, नयानगर भागात एका वाढीव बेकायदा इमारतीचे मजले बांधल्याप्रकरणी महापालिकेने त्यांच्यावर एमआरटीपीचा वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल केला आहे. वरचे मजले बेकायदा असल्याने पालिकेचा त्यावर कारवाईचा हातोडा पडणार आहे. याशिवाय, मुनावर यांनी काही जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम घेतलेले आहे, तेदेखील रखडलेले आहे. त्यामुळे त्यातील रहिवासी संतापले आहेत. नयानगर पोलीस ठाण्यात या तक्रारीची चौकशी सुरू आहे. त्यामुळे बांधकामांवर कारवाई टाळण्यासह अन्य कायदेशीर अडचणींमध्ये पालिका आणि प्रशासनावर पकड असणारे भाजप आ. नरेंद्र मेहता यांची मोठी मदत मुनावर यांना होणार आहे.मुनावर यांना घेण्यामागे अर्थपूर्ण कारणच्मुझफ्फर यांच्या भावाने भाजपमध्ये प्रवेश केला, असा प्रचार करून शहरातील नागरिकांमध्येदेखील चर्चेचा विषय घडवून मुझफ्फर व कुटुंबीयांना राजकीय धक्का देण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे स्पष्ट आहे.च्मेहतांनी मुनावर यांना भाजपमध्ये आणण्यामागे राजकीयच नव्हे तर अर्थपूर्ण कारण असल्याचे स्थानिक जाणकार सय्यद मोईनुद्दीन, साबीर शेख यांचे म्हणणे आहे.च्मुनावर यांचा भाजपप्रवेश मेहतांच्याच अडचणीचा ठरणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :mira roadमीरा रोडthaneठाणे