कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:45 IST2019-04-18T01:45:19+5:302019-04-18T01:45:37+5:30

कारच्या धडकेमध्ये सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या निर्मला कमलाकर भिसे (७९, रा. निलगिरी, गावंडबाग, उपवन, ठाणे) यांचा मृत्यू झाल्याची घटना १८ मार्च २०१९ रोजी घडली होती.

Death of a woman in a car crash | कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

ठाणे : कारच्या धडकेमध्ये सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या निर्मला कमलाकर भिसे (७९, रा. निलगिरी, गावंडबाग, उपवन, ठाणे) यांचा मृत्यू झाल्याची घटना १८ मार्च २०१९ रोजी घडली होती. याप्रकरणी चौकशीअंती एक महिन्यानंतर चितळसर पोलीस ठाण्यात दीपाली घाडगे या कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
उपवन भागातील पायलादेवी मंदिर चौकाकडून गावंडबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून निर्मला या १८ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता फेरफटका मारत होत्या. त्याचवेळी घाडगे यांच्या भरधाव कारची त्यांना जोरदार धडक बसली. त्यात निर्मला यांचा मृत्यू झाला.

Web Title: Death of a woman in a car crash