शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाच्या वादातून परदेशातून परतलेल्या तरुणाची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 17:11 IST

घराशेजारी असलेल्या शैचालयाच्या वादातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची चाकूचे वार करुन हत्या केली. या आधी देखील त्यांच्यावत वाद झाले होते. ज्या तरुणाची हत्या झाली आहे तो तरुण नुकताच परदेशातुन सुट्टीवर आपल्या घरी आला होता.

 

अंबरनाथ - घराशेजारी असलेल्या शैचालयाच्या वादातून एका तरुणाने  दुसऱ्या तरुणाची चाकूचे वार करुन हत्या केली. या आधी देखील त्यांच्यावत वाद झाले होते. ज्या तरुणाची हत्या झाली आहे तो तरुण नुकताच परदेशातुन सुट्टीवर आपल्या घरी आला होता. दोन दिवसानंतर तो पुन्हा परदेशात कामासाठी जाणार होता. त्या आधीच त्याची हत्या झाल्याने अंबरनाथच्या उलनचाळ परिसरात वातावरण तंग झाले आहे. 

रिजवान अब्बास शेख (27) हा मुळचा उलनचाळ येथे राहणार तरुण कामानिमित्त परदेशात असतो. त्याचा विवाह निश्चित झाल्याने त्यासाठी तो कामावरुन सुट्टी घेऊन अंबरनाथमध्ये आला होता. काही दिवसांपूर्वी त्याचा विवाह देखील निश्चित झाला होता. पुन्हा लगनसाठी घरी यावे लागणार असल्याने दोन दिवसात तो पुन्हा परदेशात कामानिमित्त जाणार होता. मात्र बुधवारी सायंकाळी रिजवाज आणि त्याचा शेजारी राहणारा खालीद सैय्यद यांच्यात शौचालयाच्या वादातून भांडण झाले. या आधी देखील त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. मात्र हा वाद जिवघेणा ठरेल असे रिजवानला कधी वाटले देखील नव्हते. बुधवारी पुन्हा रिजवान आणि खालीद यांच्यात वाद झाल्यावर खालीदने रिजवानच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारुन त्याला जखमी केले.रिजवान खाली पडल्यावर त्याच्या छातीवर आणि पोटावर चाकुने वार करुन खालीद पळून गेला. या हल्लयात गंभीर जखमी झालेल्या रिजवानला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू ओढावला. या हत्येनंतर पोलीसांनी खालीद विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनPoliceपोलिस