एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील अपघातात डोंबिवलीतील सचिन कदमचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 22:23 IST2017-09-29T22:23:56+5:302017-09-29T22:23:56+5:30
एल्फिस्टनच्या दुर्घटनेत डोंबिवलीतील सचिन कदम(40) राहणार विहंग अपार्टमेंट, राममंदिर, देवीचौक डोंबिवली पश्चिम. घरचा कर्ता पुरुष गेल्याने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील अपघातात डोंबिवलीतील सचिन कदमचा मृत्यू
अनिकेत घमंडी
डोंबिवली- एल्फिस्टनच्या दुर्घटनेत डोंबिवलीतील सचिन कदम(40) राहणार विहंग अपार्टमेंट, राममंदिर, देवीचौक डोंबिवली पश्चिम. घरचा कर्ता पुरुष गेल्याने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एल्फिस्टन येथे हॉलमार्क लिफ्ट प्रा.लिमिटेड या कम्पनीत क्लार्क चे काम करायचे. बालपणापासून कदम डोंबिवलीतच वास्तव्याला होता. सचू उठ का झोपलास अशी हाक पत्नी सुचिता सतत मारत होत्या.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा(7), भाऊ असा परिवार आहे. पती गेल्याचे पत्नी सुचिता स्वीकारत नसल्याने तिची समजूत कशी काढावी हा मोठा प्रश्न कुटुंबियासमोर होता. या घटनेचा त्यांना प्रचंड धसका घेतला असून पुढं काय होणार मुलगा तनिष्क यास डॉक्टर बनवण्याचे स्वप्न कसे।पूर्ण होणार असे सवाल त्या करत होत्या. सकाळी त्या साडेआठ च्या सुमारास पतीला सोडायला डोबिवली रेल्वे स्थानकापर्यँत गेल्या होत्या. घरात नवरात्रीचे घट बसले असून असं होणारच नाही असं त्या सांगत होत्या.
कुटीमबीयांच सांत्वन करण्यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे, हरीश गावकर, सुजित नलावडे यांच्यासह मयत सचिन चे मित्र, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त झाली. रात्री उशिराने पूर्वेकडील रामनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.